उमेद अंतर्गत ग्रामसंघ उपसमिती प्रशिक्षण वर्गास मुख्यमंत्री "लाडकी बहीण" योजनेच्या दीपालीताई खोत,यांची भेट.

प्रतिनिधी : श्री.अनिल मोरे 

कराड (सातारा) : मसूर येथे उमेदअंतर्गत कल्पतरू प्रभाग संघ. मसूर ग्रामसंघ उपसमिती प्रशिक्षण वर्गास अध्यक्ष मुख्यमंत्री "लाडकी बहीण" योजना शासकीय समिती मा. दिपालीताई खोत, यांनी प्रत्यक्ष भेट दिली. 

यावेळी 21 गावांमधील प्रत्येकी तीन महिला प्रतिनिधी अशा 63 महिला या महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थित होत्या. या कार्यक्रमा प्रसंगी बोलताना दिपालीताई खोत, म्हणाल्या महिला ही आता अबला नारी, नसून सबला नारी, आहे. ती आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करू शकते.त्याचबरोबर समाजात सन्मानाने मान उंचावून चालू शकते.

आता महायुती सरकारने सुद्धा मान्य केले आहे की महिलांची शक्ती मोठी आहे.महिलांनी मनात आणले तर सत्ता परिवर्तन सुद्धा निश्चित करू शकते. त्यामुळे महायुती सरकार विशेष करून महिलांच्या बाबतीत खूप सकारात्मक आहे.तसेच सरकारची "लाडकी बहीण" योजनेमुळे गोरगरीब कष्टकरी महिलांचा स्वाभिमान जागी झाला आहे.

महिलांना यापुढे कोणासमोर हात पसरण्याची गरज नाही. यापुढे महिलांनी स्वतःच्या स्वकर्तृत्वावर छोटे मोठे व्यवसाय उद्योग सुरू करावे त्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रधानमंत्री स्वयंरोजगार कर्ज योजना, मुख्यमंत्री स्वयंरोजगार कर्ज योजना,अन्नप्रक्रिया व्यवसाय कर्ज योजना, मुद्रा कर्ज योजना अश्या अनेक योजना राबवत आहे.असेही त्यांनी सर्व महिलांना प्रोत्साहन दिले.

या कार्यक्रमावेळी अध्यक्ष मुख्यमंत्री "लाडकी बहीण" योजना शासकीय समिती दीपालीताई खोत, प्रभाग संघ अध्यक्षा गीतांजली इंगवले, किवळ ग्रामसंघ प्रेरिका रेखा साळुंखे, प्रशिक्षिका मयुरी बाजरे, प्रतिभा कुंभार, योगिता जाधव, रुपाली भांडवले, अश्वीनी पवार, सुषमा चव्हाण, शैला चव्हाण, किरण गोसावी, सुरेखा चव्हाण, राधा यादव, शुभांगी पवार, व आदी महिला मोठया प्रमाणात उपस्थित होत्या.

न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / कराड (सातारा)

Post a Comment

Previous Post Next Post