हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे,यांची जयंती शिवसेना कराड शहर पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या वतीने उत्साहात संपन्न

प्रतिनिधी : श्री.अनिल मोरे


कराड (सातारा ) : हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, यांची 99 वी जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस शिवसेना कराड शहर पदाधिकारी व शिवसैनिकांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. तसेच कराड उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून फळे वाटप करून जयंती साजरी करण्यात आली.

 या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना शिवसेना कराड शहर प्रमुख राजेंद्र माने, पुढे म्हणाले हिंदु हृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे,यांची आज 99 वी जयंती आहे. ही जयंती सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही शिवसैनिक साजरी करत आहोत. कारण शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे,यांनी सर्व शिवसैनिकांना एक बाळकडू दिले आहे. ते बाळकडू म्हणजे 80 टक्के समाजकारणाने आणि 20 टक्के राजकारण या हेतूने प्रेरित होऊन शिवसेना पक्ष आणि सर्व शिवसैनिक सर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्रबिंदू ठेवून शिवसेना पुढे नेत आहोत.

तसेच आमचे दैवत स्व.बाळासाहेब ठाकरे, यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे. कारण आम्ही सर्व शिवसैनिक त्यांच्या विचारांचे वैचारिक वारसदार आहोत.ज्यावेळेस हिंदुत्वाचा महाराष्ट्राला आणि देशाला विसर पडला होता. हिंदू विस्कळीत झाला होता.त्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, यांनी महाराष्ट्राचा हिंदुत्वाचा बाणा आणि मराठी माणसाचा ताट कना स्वाभिमानाने जिवंत ठेवला. आणि छातीची ढाल बनून हिंदू समाजाला एकत्र ठेवण्याचे काम स्व.बाळासाहेब ठाकरे, यांनी अखेरच्या श्वासापर्यंत सातत्याने केले आहे.आणि तसेच या पुढच्या काळातही नव्या तरुण पिढी साठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि सध्याचे शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे साहेब, मोठया ताकतीने समाजातील गोरगरीब घटकांसाठी ते काम करत आहेत.असे ते बोलत होते.

या कार्यक्रमा वेळी उपस्थित शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र माने, उपतालुका प्रमुख मुकेश मोरे, उपजिल्हाप्रमुख शंकर वीर, उपशहर प्रमुख गणेश भोसले, उपशहर प्रमुख संदीप थोरवडे,आदी मनोज बिनवडे, रणवीर बिनवडे, बळवंत कदम, प्रदीप घार्गे, अशोक शिंदे, मंगेश कुलकर्णी, गणेश देशपांडे, मेहबूब शेख, हे सर्व शिवसैनिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / कराड (सातारा)

Post a Comment

Previous Post Next Post