कोल्हापूर : सावकार लोकांची पिळवणूक करतील. सावकार जनतेची पिळवणूक करणारच कारण आपल्या देशातील १४० कोटी लोकसंख्या पैकी ८० कोटी लोकांना जर सरकार मार्फत मोफत धान्य मिळत असेल तर आपल्या देशाची लोक उद्योगी बनणार ? की आळशी बनणार ? हा संशोधनाचा भाग आहे. समाजात लोकांची स्थिती खाऊ असेल तर काम न करता फुकटची कशी मिळत राहील अशी लोकांना सवय लागणार आहे. काम नको किंवा काम असून काम करणार नसतील. धान्य कधी मिळेल याची वाट पाहत बसत असतील तर त्यांची आर्थिक स्थिती कधीच सुधारणार नाही.
त्यामुळे त्यांना कोणी बँकेचे किंवा पतसंस्थांचे कर्ज काढल्या शिवाय त्यांना घरात खर्च करता येत नाही. पण त्यांना बँकेचे कर्ज कमी व्याजदरात मिळत असते. पण त्यासाठी कागदपत्राची पूर्तता करण्या साठी शिवाय एक दोन जामीन शोधायला लागतात. त्यामुळे कोणत्याही बँक किंवा पतसंस्था सर्व बाबींची पूर्तता केल्याशिवाय कर्ज देत नाही. त्यासाठी मग गावात किंवा परिसरात कोणी कर्ज देणारा सावकार असेल तर त्याचा शोध घेतात. कधी कोणी कर्ज घेणार असेल तर कर्ज देणारा याची वाट पाहत असतो. तो कर्ज घेणारा आला की बकरा आला असेच सावकार विचार करत असतो. बँकेचा व्याजदर आणि वार्षिक असतात.
पण कोणा सावकारांचा तोच व्याजाचा दर हा दरमहाचा असतो. म्हणजे व्याजाचा दर बँकेच्या दराच्या बारापटीने जास्त असतो. पण तो व्याजदर देण्यास सुद्धा कर्ज घेणारा तयार असतो. कारण अडला नारायण तरी गाढवाची पाय या मराठी म्हणी प्रम ाणे सावकाराचा हा गोरस धंदा राजरोस बिनबोबाट सर्वत्र चालू आहे. कर्ज घेणाऱ्याला पैशाची गरज असल्यामुळे त्याप्रमाणे सर्व अटी व व्याजाचा दर मान्य करत असल्यामुळे बँकेपेक्षा झटपट काही तासातच सावकाराकडून कर्ज मिळत असते.
पण ज्यावेळी सावकार कर्जाची वसुली सुरू करतात तेव्हा मात्र कर्ज घेणाऱ्यांची तारांबळ होत असते. सावकार त्यांची काही लोक केवळ कर्ज वसुली करण्यासाठी पगारी ठेवलेले असतात. जर कर्ज घेणाऱ्या कर्ज फेड करण्यास टाळटाळ करत असेल तर ते कर्ज घेणाऱ्याला मारहाण सुद्धा केली जात असते. आपण अशा कितीतरी बातम्या यापूर्वी आपल्या वाचनात आलेल्या आहेत. तर काही सावकार यांनी काही कर्ज घेणारे यांचे वसुली साठी अपहरण सुद्धा केलेल्या बातम्या वाचल्या आहेत आणि त्यामुळे सावकार हा कर्ज घेणाऱ्या कर्जदाराची पिळवणुक करीत असतात. कोणी सावकाराविरोधी तक्रार केली तर सावकार पैशाच्या जोरावर केलेली तक्रार मागे घेण्यास भाग पाडत असतो. श्रअशीच एक बातमी परवा वाचनात आलेली आहे.
ती अशी की, सावकारी जाचाम ळे कुटुंबाने घेतला गळफास. चिखलीतील प्रकार: झोपेच्या गोळ्यांचे सेवन. पती बचावला मायलेकांचा मृत्यू, पिंपरी : सावकारांच्या त्रासाला कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांनी आत्म हत्या करण्याचा प्रयत्न केला. यात मायलेकाचा मृत्यू झाला तर पती बचावला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत • चिखलीतील सोनवणे वस्तीत दिनांक १७ जानेवारी २०२५ शुक्रवारी रात्री ही धक्कादायक घटना उघडकीस आली, भांगी वैभव हांडे (वय वर्षे ३६ ) आणि धनराज वैभव हांडे (वय वर्षे ९.) अशी मृत मायलेकांची नावे आहेत.
शुभांगी यांचे पती वैभव मधुकर हांडे (वय वर्षे ४५ सर्व राहणार सोनवणे वस्ती चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यावरून संतोष कदम, संशयीत महिला दोघे राहणार ताथवडे), संतोष पवार ( राहणार कुदळवाडी चिखली आणि जावेद खान राहणार मोई तालुका खेड) पा यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव हांडे यांचे औषध दुकान असून त्यांनी २०१६ मध्ये संतोष कदमकडून ६ लाख रुपये संशयीत म हिलेकडून २ लाख जावेद खानकडून ४ लाख तर संतोष पवारकडून ७ लाख ५० हजार रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. त्या मोबदल्यात वैभव यांनी संतोष कदम याला त्यांच्या मुदलाची परतफेड करून ९ लाख ५० हजार रुपये दिले होते. एक एकर जमीनही लिहून दिली होती. संशयीत महिलेलाही दरमहा २० हजार रुपये देऊन स्वतःच्या मालकीची २० गुंठे जमीन लिहून दिली होती.
तरीही तिने १४ लाख रुपये दिल्याशिवाय जमीन परत देणार नाही, असा तगायला लावला होता. जावेद खान याने दिलेल्या कर्जापोटी व्याज म्हणून ४ लाख ५० हजार रुपये दिले होते. संतोष पवारलाही बहुतांश रक्कम परत दिली होती. तरीही व्याजाचे पैसे देण्यासाठी तगादा लावला होता. शिवीगाळ व दम दाटी करण्यात येत होती. या त्रासाला कंटाळून वैभव यांनी पत्नी- मुला सोबत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तिघांनी स्वतःच्या औषध दुकानातील झोपेच्या गोळ्या खाल्लूया. नंतर छताच्या पंख्याला गळफास लावून घेतला. यात शुभांगी व धनराज यांचा मृत्यू झाला. मुलाला पाठविली सुसाईड नोट... वैभव यांनी १४ वर्षीय मुलाला म बईतील नातेवाईकाकडे पाठवले होते.
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी शुक्रवारी सकाळी त्या मुलाच्या मोबाईलवर सुसाईड नोट पाठवली होती. मुलाने ही सुसाईड नोट रात्री पाहिल्यावर वडिलांना फोन केला. मात्र त्यांनी उचलला नाही. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना फोन केला. त्यांनी दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने रात्री पोलिसांना पाचारण केले. वरील प्रकारे सावकार आपल्याकडून कर्ज घेणाऱ्या लोकांनी मुद्दल व त्याचे होणारे व्याज यांची संपूर्ण परतफेड केलेली असताना आणखी रक्कम हवी आहे म्हणून कर्ज घेणाऱ्याला मोठ्या प्रमाणात सारखा छळत पिळवणूक किंवा दमदाटी करीत असल्या मुळे त्या कर्ज घेणाऱ्यांचे मनात भीती निर्माण झालेमुळेच आपण आता जिवंत राहून तरी काय उपयोग ? असाच मनात विचार आला असणार आणि आपल्या माघारी पत्नीचा आणि मुलांना हे सावकार असेच छळत राहणार म्हणून एकत्रच आत्महत्या करू असाच विचार मनामध्ये येवून त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करणेस तयार झाले असावेत. पण सावकारांचे आज ना उद्या कर्ज फेडले गेले असते. पण केवळ सावकाराच्या दम दाटीमुळे कर्जदार यांनी स्वतःच फाशी घेतली आहे. त्यामुळे त्याच्या मृत्युला सावकार जबाबदार असतील तर अशा सावकारांच्यावर सरकार कडून कठोर कारवाई करणेत यावी. या हत्येत जबाबदार असणाऱ्या सर्वावर गुन्हे दाखल करणेत यावेत. अन्यथा कर्जदारांचे सावकारच घेत राहतील बळी
न्यूज मराठी लाईव्ह
कोल्हापूर

Post a Comment