मा.नामदार शंभूराज देसाई, यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत सर्व रोग निदान, दंत आरोग्य शिबिर आणि एकात्मिक आरोग्य अभियान उत्साहात साजरा.

प्रतिनिधी : श्री.अनिल मोरे


पाटण (सातारा) : ढेबेवाडी तालुका पाटण येथे सर्व रोग निदान, दंत आरोग्य शिबिर आणि एकात्मिक आरोग्य अभियान ग्रामीण रुग्णालय येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबीरात मोफत आरोग्य तपासणीला तरुण-तरुणी महिला पुरुष व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला आणि मधुमेह तपासणी पौष्टिक आहार माहिती दंत तपासणी, स्त्रीरोग तपासणी नेत्ररोग तपासणी, व मोफत चष्मे वाटप,मानसिक रोग तपासणी, एक्स-रे,औषधी वितरण, ईसीजी, तपासणी, उच्च रक्तदाब तपासणी, क्षयरोग तपासणी, बालरोग तपासणी, त्वचारोग तपासणी,शैल्य चिकित्सक तपासणी, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे दुष्परिणाम या सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या आहेत.


     या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन मा. नामदार शंभूराज देसाई, पर्यटन खणीकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली .त्यांचबरोबर मा. डॉ. राधाकिसन पवार, उपसंचालक आरोग्य सेवा पुणे. मा. डॉ. युवराज करपे, सिव्हिल सर्जन जिल्हा रुग्णालय सातारा. डॉ. राहुल जाधव,सहसंचालक मूलभूत सेवा महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई. मा. डॉ. सुभाष कदम, बाह्य संपर्क अधिकारी सिविल हॉस्पिटल सातारा. मा. डॉ. नवनाथ कांबळे,तालुका आरोग्य अधिकारी पाटण मा. डॉ. आर. बी. यादव, वैद्यकीय अधीक्षक ग्रा. रुग्णालय ढेबेवाडी. यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले, सणबूर, काळगाव, सळवे येथील वैद्यकीय अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचारी, आशा, गट प्रवर्तक, याचे सहकार्य लाभले.
      कार्यक्रमाचे आयोजक ग्रामीण रुग्णालय, ढेबेवाडी व तालुका आरोग्य अधिकारी पाटण यांनी केले होते.







न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / पाटण (सातारा)

Post a Comment

Previous Post Next Post