नवजीवन विद्यालय कुडाळ येथे प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा.


कुडाळ (जावली) : नवजीवन विद्यालय कुडाळ येथे प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला, प्राचार्या मा.सौ. रोहिणी राजे निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी मिळून कार्यक्रम खूप छान रीतीने पार पाडला.


संविधान सभेने तयार केलेले संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीयांनी स्वीकारले. त्यावेळी संविधानातील काही कलमे लागू झाली होती पण पूर्ण सविंधान लागू झाले नव्हते. नंतर २६ जानेवारी १९५० रोजी 'भारतीय संविधान' देशभरात पूर्णपणे अंमलात आले. त्यामुळे २६ जानेवारी १९५० पासून भारतात कायद्याचे राज्य सुरू झाले. 


प्रजेची सत्ता सुरू झाली म्हणजेच भारत २६ जानेवारी १९४९ ला प्रजासत्ताक झाला. त्यामुळे दरवर्षी देशभरात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / कुडाळ (जावली)

Post a Comment

Previous Post Next Post