जिल्हा परिषद शाळा ग्रामपंचायत कार्यालय पारडगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी : गणेश मंडपे

पारडगाव (घनसावंगी) : ग्रामपंचायत कार्यालय पारडगांव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण उपसरपंच शफीअहेमद सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले. शफीअहेमद सय्यद यांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वज फडकवला. 


यावेळी ग्राम अधिकारी नारायण बरिदे, तलाठी संजय कुलकर्णी साहेब , तसेच ग्रामपंचायत सदस्य व समस्त गांवकरी वर्ग आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विद्यार्थी वर्ग, लाल बहादुर शास्त्री विद्यालयातील शिक्षक विद्यार्थी वर्ग, प्रतिष्ठित नागरिक, अंगणवाडी सेविका, पारडगांव ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी, भागवत ढेरे, विष्णू खरात, रामेश्वर ढेरे, सोमनाथ मंडपे, विशाल खरात तसेच जिल्हा परिषद प्राथमिक पारडगाव शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. 

महात्मा गांधीजींच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून शालेय शिक्षण समिती सदस्य अध्यक्ष ज्ञानेश्वर डोळझाके तसेच रिज कुरेशी, सदस्य, उपसरपंच ग्राम अधिकारी बरिदे सर, तलाठी कुलकर्णी साहेब यांनी पुजन केले आणि मुख्याध्यापक शिरसाट सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 


यासोबत उर्दु शाळा पारडगांव येथे ध्वजारोहण मुख्याध्यापक सय्यद मुकीद सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग शिक्षकवृंद तसेच स्थानिकांची उपस्थिती होती. 

न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / घनसावंगी (जालना)



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने