माता भगिणींनी दर्शनवारीचा मनसोक्त आनंद घ्यावा -विलास बाबा जवळ

प्रतिनिधी : श्री.सुनील धनावडे 


मेढा (जावली) : आई श्री.महालक्ष्मी ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष वैभव ओंबळे दरवर्षी गावातील, परिसरातील महिलाना विविध देवस्थानची दर्शन वारी घडवतात. यावर्षी सुद्दा 26 जानेवारी रोजी गावातील,परिसरातील 250 महिलांना जेजुरीच्या खंडोबा चे, मोरगाव च्या मयुरेश्वराचे दर्शन घडविले, जावळी तालुक्यातील या ट्रस्टने सलग दुसऱ्या वर्षीही हा सुंदर उपक्रम कायम ठेवला आहे. 


कार्यक्रमाच्या उदघाट्न प्रसंगी व्यसन मुक्त युवक संघाचे राजाध्यक्ष विलास बाबा जवळ म्हणाले दर्शनवारी हा उपक्रम स्तुत्य आहे तसेच या दर्शन वारीचा माता भगिनींनी मनसोक्त आनंद लुटा.कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना तिरंगा टोपी आणि हातातील तिरंगा बँड देण्यात आले. 
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज,माता महालक्ष्मी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तसेच बोंडारवाडी धरणाचे जनक स्व विजयराव मोकाशी यांचे प्रतिमेस पुष्पहार घालून, दिपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी सर्व कार्यकर्ते तसेच उपस्थित महिला वर्ग आणि प्रमुख मान्यवर उपस्थीत होते " अमर रहे अमर रहे मोकाशी साहेब अमर रहे " अशा घोषणा सभास्थानी देणेत आल्या . ज्या ज्या वेळी बोंडारवाडी धरणासाठी तुम्हाला हाक दिली जाईल त्यावेळी सर्व महिलांनी आम्हाला आशीर्वाद देणेसाठी उपस्थीत रहावे अशी इच्छा उपस्थितांनी व्यक्त केली. सरपंच परिषदेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष बजरंग चौधरी यांनी संघटनेचे महत्त्व समाजापुढे मांडले. आई श्री महालक्ष्मी ट्रस्टचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री वैभव ओंबळे यांनी कार्यक्रमाचे पूर्ण श्रेय हे संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आहे असे मत व्यक्त केले.


सदरच्या देवदर्शन प्रवासामध्ये कै.विजयराव मोकाशी साहेब यांचे बंधू श्री राजेंद्र मोकाशी ( सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई ) यांनी महिलांना मार्गदर्शन केले आणि डॉ.कोकाटे लिखित माँ जिजाऊ यांच्या जीवन गाथेवर आधारित चलचित्राच्या 300 पुस्तकांच्या प्रति महिलांना वाटप केल्या. सदरच्या कार्यक्रमानिमित्त व्यसनमुक्ती युवक संघटनेचे राजाध्यक्ष विलास बाबा जवळ,केळघर गावचे सुपुत्र दानशूर व्यक्तिमत्व राजेंद्र शेठ धनावडे,सरपंच परिषद सातारा जिल्हा उपाध्यक्ष बजरंग चौधरी, जावली तालुका डिजीटल मिडीया पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनिल आण्णा धनावडे,बोंडारवाडी धरण कृती समितीचे नारायण सुर्वे, श्रीरंग बैलकर,जगन्नाथ जाधव, सुरेश कासुर्डे, विलास शिर्के, जगन्नाथ पार्टे, संकेत पाटील, उषा उंबरकर, सुधा चिकणे या सर्वांनी उपस्थिती
दर्शवली होती .


सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाधान ओंबळे,प्रथमेश भणगे,गणेश ओंबळे ,अमोल ओंबळे, सचिन ओंबळे केवल ओंबळे, नवनाथ ओंबळे, भानुदास ओंबळे , प्रताप लोहार, संतोष गायकवाड , अजय ओंबळे ,मंगेश ओंबळे, भैरवनाथ ओंबळे या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले. पुणे विभागातील ट्रस्टचे कार्यकर्ते रणजीत ओंबळे,अक्षय ओंबळे, नितीन ओंबळे आणि स्वप्निल ओंबळे यांनी महिलांमध्ये अल्पोपहाराचे वाटप केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदा ओंबळे यांनी केले. आभार राजेंद्र जाधव यांनी मानले.

न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / मेढा (जावली)

Post a Comment

Previous Post Next Post