प्रतिनिधी : श्री.चंद्रशेखर जाधव
वाघेश्वर (जावली) : दि. 28/1/2025 कागदकाम व वारली चित्रकला कार्यशाळा विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु.श्रद्धा धनावडे ने घेतली. विद्यार्थ्यांनी सुंदर कलाकृती बनवल्या.
दि.29/1/2025 कला व ग्रंथ प्रदर्शन उदघाट्न श्री.संदीप शिंदे
कलाशिक्षक इंग्लिश स्कुल,वडूथ श्री. जगनाथ जाधव ,अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, श्री.विष्णू साळुंखे सरपंच केसकरवाडी, श्री.हरिबा गायकवाड पोलीस पाटील केसकरवाडी, यांचे हस्ते झाले.
विद्यार्थ्यांची चित्र,भेटकार्ड,आकाशकंदील,कागदी पिशव्या,बाहुल्या,इ.कलाकृती पाहून पाहुण्यांनी कौतुक केले.
आज श्री.संदीप शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना सुंदर निसर्गचित्राचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
विद्यालयाच्या कलाशिक्षिका सौ.वलेकर एस.पी. यांनी या कार्यशाळेचे आयोजन व सूत्रसंचलन केले.सौ.तारळकर डी. यू. यांनी ग्रंथ प्रदर्शन मांडणी केली,प्रभारी मुख्याध्यापिका सौ.तोरणे यू.ए.यांनी मार्गदर्शन केले.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / वाघेश्वर (जावली)


Post a Comment