बातमी : श्री.अनिल करंदकर (पाटील)
जावली : ग्रामीण भागातील मॅरेथॉनपटू सचिन निकम यांचा सातारा ते अमेरिकेतील बोस्टन मॅरेथॉनचा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास.....!!!
खुदी को कर बुलंद इतना की, हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे, बता तेरी रझा क्या है...! आपल्या प्रचंड मेहनत जिद्द आणि चिकाटीने करंदी तर्फ कुडाळ ता.जावली जि. सातारा येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सचिन गणपत निकम यांनी टाटा मॅरेथॉन मुंबई 2025 मध्ये इतिहास घडवला.
नुकत्याच मुंबईमध्ये झालेल्या या स्पर्धेत 42 किलोमीटर मॅरेथॉन मध्ये 3 तास 3 मिनिटांमध्ये हे अंतर पूर्ण करून त्यांनी इतिहास रचला आहे. सातारा जिल्ह्यातील ३० वर्षे पुढील वयोगटातील टाटा मुंबई मॅरेथॉनमधील स्पर्धकांच्यातील ही सर्वोत्तम वेळ ठरली आहे. याच सफलतेच्या जोरावर आज ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील बोस्टन मॅरेथॉनमध्ये भारत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
*खरंतर सचिन हे गणपतराव आणि सुलोचना या शेतकरी कुटुंबातील दांपत्याचे सुपुत्रआहेत. ते स्वतः शेती, दुग्धव्यवसाय सांभाळून विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होतात. आज पर्यंत त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन उज्वल यश संपादन केले आहे.
मुंबई ,पुणे, कोल्हापूर, निपाणी,सांगली, बारामती, पन्हाळा,वाई गरवारे इ. हाफ मॅरेथॉन इत्यादींचा समावेश आहे. सचिनच्या या यशामध्ये शिवस्पिरिट क्लब सातारचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आदरणीय शिव यादव सर यांचा सिंहाचा वाटा आहे. सचिन त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीचा व्याप सांभाळून अखंडित सराव करत आहेत. त्यांचा हा प्रवास थक्क करणारा व इतरांना प्रेरणादायी ठरला आहे. विशेष म्हणजे त्यांची कन्या कु. अनुष्का व कु. रचना या दोघीही शालेय स्पर्धांमध्ये धावपटू म्हणून सहभागी होत असून उज्वल यश संपादन करीत आहेत. पत्नी सौ. निलम यांची तसेच बंधू श्री प्रवीण व भावजय सौ. रेश्मा यांची खंबीर साथ त्यांना लाभत आहे. तसेच जिल्हा क्रीडा समन्वयक शिवाजी निकम यांचेही सहकार्य लाभत आहे.
सचिनच्या या दैदीप्यमान यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशाचा सर्व सातारकरांना सार्थ अभिमान वाटतो.सचिनला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शिव स्पिरीट क्लब, सातारमधील सहकारी आणि श्री आदर्श जनता शैक्षणिक व वैद्यकीय संस्था (करंदी) मुंबई (रजि) तसेच ग्रामस्थ मंडळ, करंदी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच जावली तालुक्यातच नव्हे तर सातारा जिल्हात अभिनंदन होत आहे.
न्युज मराठी लाईव्ह
जावली / सातारा



Post a Comment