जे इ इ नीट च्या नावाखाली काही कॉलेजचे "गोरख धंदे" -विनायक भोसले

कराड (प्रतिनिधी ) : श्री.अनिल मोरे

कराड : गेल्या काही महिन्यांपासून "महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना " यांचा कराड विद्यानगर परिसरामध्ये सर्वे आणि स्टिंग ऑपरेशन याच्या माध्यमातून असे निदर्शनास आले आहे की. कराड मधील काही कॉलेज विद्यार्थ्यांना केवळ कागदोपत्री, प्रवेश देऊन कॉलेजच्या वेळेमध्ये खाजगी क्लासेस आणि अकॅडमी मध्ये राजरोसपणे बसण्याची मुभा देत आहेत.

सदर ही बाब लक्षात आल्यानंतर "महाराष्ट्र निर्माण विद्यार्थी सेना"यांनी लेखी पत्रकाद्वारे शिक्षणाधिकारी, सातारा.यांच्या लक्षात व निदर्शनास आणून दिले होते. पण त्या पत्रकाद्वारे संबंधित कॉलेजचे प्राचार्य, मुख्याध्यापकावर, कायदेशीर, गुन्हा दाखल करण्याची पत्रकाद्वारे मागणी केली होती. परंतु आज रोजीपर्यंत. शिक्षणाधिकारी, सातारा.यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नसल्यामुळे संबंधित कॉलेजच्या प्राचार्यावर ,व मुख्याध्यापकावर,कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केली नसल्याचे दिसून आले आहे. 

असे "महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना" यांनी सदर अकरावी व बारावीच्या सायन्सच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना. काही कॉलेजचा चाललेला हा प्रकार प्रेस नोट द्वारे वर्तमानपत्राच्या माध्यमातून निदर्शनास आणून देत आहेत." महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना " जिल्हाध्यक्ष - विनायक भोसले, व सर्व पदाधिकारी.

न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / कराड

Post a Comment

Previous Post Next Post