हिंगोली (प्रतिनिधी) : श्री.निलेश सुर्वे
हिंगोली : जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील प्रतीक गंगाधरराव अवचार याची पहिल्याच प्रयत्नात सेवेत निवड झाली आहे. पहिल्याच प्रयत्नात अग्निवीर सेवेत निवड झाल्यामुळे सर्व स्तरातून त्याचे कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे. ओडिसा या राज्यामध्ये त्याचे प्रशिक्षण चालू असून प्रशिक्षण पूर्ण होताच प्रतीक सात वर्ष राष्ट्रसेवा करणार आहे.
प्रतीक याचे लहानपणापासूनच सैन्यामध्ये जाण्याचे स्वप्न होते. त्या दिशेने तो तयारी करीत होता. लहानपणापासूनच तो जिद्दी चिकाटी व मेहनती होता. व्यर्थ गोष्टीत आपला वेळ न गमावता तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास व मैदानी सराव करीत होता. 2024 ला तो बारावी उत्तीर्ण झाला आणि अवघ्या 18 व्या वर्षी तो अग्निवीर सेवेत भरती झाला.
अवघ्या पहिल्याच प्रयत्नामध्ये तो भरती झाल्यामुळे त्याचे सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत आहे. प्रशिक्षण पूर्ण होताच तो गावात आल्यावर भव्य आणि दिव्य स्वागत करून त्याची पूर्ण गावभर मिरवणूक गावकऱ्यांच्या वतीने काढण्यात येणार आहे.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / हिंगोली



Post a Comment