वीर जवान चंद्रकांत काळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंसह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

प्रतिनिधी : श्री.लालासाहेब माने (पाटील)


वडूज (सातारा) : खटाव हुतात्मा भूमी वडूज गावचे सुपुत्र, 18 मराठा तोफखाना रेजिमेंटचे नाईक सुभेदार वीर जवान चंद्रकांत महादेव काळे यांना राजस्थान येथील महाजन फायरिंग रेंज युद्ध अभ्यास प्रशिक्षण दरम्यान कर्तव्य बजावत असताना विरगती प्राप्त झाली.दिनांक- 31 जानेवारी 2025 रोजी माधवनगर वडूज येथे त्यांच्यावर शासकीय ईतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.


यावेळी महाराष्ट्राचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी आ. डॉ.दिलीप येळगावकर, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर , माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, तहसीलदार बाई माने,पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतीश हंगे आदींनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.


सुमारे 23 वर्षांपासून वीर जवान चंद्रकांत काळे (वय) हे गुरुवारी रात्री 18 मीडियम मराठा तोफखाना रेजिमेंट चे राजस्थान येथील महाजन फायरींग रेंज मध्ये युध्द अभ्यास ट्रेनिंग घेत असताना त्यांना वीर मरण आले .शहीद काळे हे गेली तेवीस वर्षे देश सेवेत रुजू होते. ते राजस्थान येथे आठरा मीडीयम रेजिमेंट मध्ये अटलरी डिपार्टमेंट मध्ये नाईक सुभेदार या पदावर ती कार्यरत होते.


दरम्यान त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र शोक व्यक्त होत असून वीर जवान चंद्रकांत महादेव काळे यांचं पार्थिव सायंकाळच्या सुमारास वडूज येथे आणण्यात आलं. त्यानंतर वडूज शहरातून पार्थिव यात्रा काढण्यात आली.पोलीस व सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदकीच्या फैरी झाडून आणि बँडपथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर तिरंगा ध्वज कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. वीरपत्नी मनीषा चंद्रकांत काळे ,आई किशाबाई, वडील महादेव काळे,मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती, भाऊ हिराचंद यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर मुलगा श्रेयस यांनी पार्थिवाला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. 


यावेळी मेडीयम रेंजमेंट चे ओनररी कॅप्टन शांताराम पवार, पुणे विभाग सैनिक कल्याण कार्यालय अधिकारी कर्नल डी एस हांगे,हवालदार पी एच धुमाळ, हवालदार दीपक शिंदे, सुभेदार एस के बर्गे, 22 महाराष्ट्र बटालियन एन सी सी कर्नल राजमणार एम ए सेनामेडल, ओनररी कॅप्टन बंडा कोकरे, 18 मेडीयम रेजमेंट चे प्रमुख कर्नल रचित शर्मा, कॅप्टन संजय मोहिते, सातारा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे पदाधिकारी, आजी माजी सैनिक संघटना पदाधिकारी, जय हिंद फौंडेशन च्या फडतरे मॅडम, पूनम साळुंखे,वीर पत्नी भारती जाधव, विरपत्नी अश्विनी सत्रे, विरपत्नी अर्चना नाळे, विरपत्नी यादव,सैनिक फेडरेशन चे कार्याध्यक्ष उत्तमराव करळे, निवास पवार, जिम काझी, एन सी सी अधिकारी चिफ ऑफिसर राजेंद्र जगदाळे, फर्स्ट ऑफिसर नामदेव मुठे आदी लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / वडूज (सातारा)

Post a Comment

Previous Post Next Post