जावली तालुक्यातील जि.प.शाळा राणगेघर यांच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

बातमी : श्री.अनिल करंदकर (पाटील)


सातारा (जावली) : रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानगेघर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी प्रभात फेरी व तदनंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. मुख्याध्यापक श्री संजय नामदेव गोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 


राष्ट्रगीत ध्वजगीत महाराष्ट्र गीत व समूहगीत मुलांनी सुस्वर गायन केले तद्नंतर खडे कवायत प्रकार बैठेकवायत प्रकार साधनयुक्त कवायतप्रकार घेण्यात आले त्याचबरोबर झांज पथकाचे सुंदर प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी करून दाखवले. तद्नंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे केली. तसेच देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर करण्यात आली. या स्पर्धांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले त्यांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले. 


तसेच चालू वर्षी यशवंतराव चव्हाण क्रीडा स्पर्धेत आपल्या शाळेतील विद्यार्थिनी तेजस्विनी शंकर भोसले हिने 600 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आणि लांब उडी मध्ये निशांत अजित भोसले या विद्यार्थ्यानेही यश संपादन केले त्याबद्दल त्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर निरंतर ठेव योजनच्या रकमेतून येणाऱ्या व्याजातून इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना आणि अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनाही बचत गटाच्या मार्फत वही पेन या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय गोळे सर व श्री महादेव खरपाडे सर यांनी केले.या वेळी अंगणवाडी सेविका सौ,अंकिता विशाल करंदकर, व सेविका सौ.सुरेख वसंत भोसले आणि ग्रामपंचायत सरपंच सदस्य शाळा कमिटी अध्यक्ष सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी श्रीमती प्रियांका वाले यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.

न्युज मराठी लाईव्ह 
राणगेघर (जावली)

Post a Comment

Previous Post Next Post