बातमी : श्री.अनिल करंदकर (पाटील)
मुंबई : महाराष्ट्र शासनाचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आज प्रथमच शिवसेनेच्या मंत्र्यांचा जावली शिवसेना पदाधिकारी आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे छोटेखानी सन्मान करून मंत्री महोदयांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी श्री.प्रतापराव जाधव -केंद्रीय आरोग्य , कुटुंब कल्याण मंत्री श्री.शंभूराजे देसाई साहेब - पर्यटन मंत्री श्री.भरतजी गोगावले साहेब - रोजगार हमी योजना मंत्री श्री.संजयजी शिरसाट साहेब - सामाजिक न्याय मंत्री श्री.प्रकाशजी आबिटकर साहेब - आरोग्य मंत्री
या मंत्री महोदयाना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. तसेच सातारा जावळी चे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा ही गाव भेट दौरा असताना सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना सातारा-जावली शिवसेना नेते एकनाथ(दादा)ओंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जावली तालुका प्रमुख समीर तुकाराम गोळे, विधानसभा प्रमुख प्रशांत तरडे, तालुका संपर्क प्रमुख राम शिंदे, वैद्यकिय मदत कक्षाचे प्रशांत जुनघरे आणि सुधीर करंदकर, उपतालुकाप्रमुख सचिन शेलार,चंद्रकांत गोरे, दत्तराज धनावडे, समिर जाधव,प्रमोद जवळ,राजेंद्र शेलार व इतर सहकारी उपस्थित होते...
यावेळी तालुकाप्रमुख समीर गोळे यांनी जावली तालुक्यातील प्रलंबित विविध विकास कामांवर मंत्री महोदयां बर चर्चा केली..
न्यूज मराठी लाईव्ह
मुंबई





टिप्पणी पोस्ट करा