प्रतिनिधी : श्री.संजय वांगडे
कुसुंबी (जावली) : नाचणीचे गाव तीर्थक्षेत्र कुसुंबी तालुका जावली येथील श्री काळेश्वरी देवीच्या वज्रलेपाला एक वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १० व ११ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री काळेश्वरी देवी देवस्थानचे अध्यक्ष रामदास वेंदे यांनी दिली.
शुक्रवार, दि. १० पासून सुरू होत असलेल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सायंकाळी ६ ते ७ वाजता देवीचे मंत्रपठण, रात्री ७.३० वाजता देवीची महाआरती, रात्री ९.०० वाजता देवाचा जागर भजन तसेच दि. ११ रोजी दुपारी १ वाजता वेदमूर्ती विद्या वाचस्पती महेश गोविंद पाठक गुरुजी यांच्या हस्ते विधीस आरंभ. दुपारी १२ वाजता शतचंडी महायज्ञास प्रारंभ आणि दुपारी ४ वाजता महाआरती नंतर महाप्रसाद असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या धार्मिक कार्यक्रमात भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन ग्रामस्थ व काळेश्वरी देवी देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने करण्यात आले आहे.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / कुसुंबी (जावली)

टिप्पणी पोस्ट करा