प्रतिनिधी : श्री मंदार वैद्य (काका)
जावली (सातारा) : उद्या सकाळी ६ वाजता काटवली येथून सुटणारी बस आपल्या नियोजित वेळेत काटवली येथून ठाण्या करता सुटेल. तसेच ठाण्या वरून दुपारी १:३० ला सुटणारी ठाणे - काटवली बस हि उद्या पासून दुपारी न सुटता संध्याकाळी ठाण्या वरून काटवली करिता ००:०५ मिनिटांनी सुटेल.
प्रवाशांनी बसच्या टायमिंग मध्ये केलेल्या बदलाची नोंद घ्या. आणि आपल्या रातराणी एक्सप्रेस ला भरभरून प्रतिसाद द्या.
ठाण्या वरून रात्रीची बस सोडा अशी मागणी बऱ्याच प्रवाशांनी केली होती. त्यांच्या विनंतीनुसार मेढा आगार प्रमुख यांनी उद्या पासून रातराणी एक्सप्रेस चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदर बसला प्रवाशांनी भरपूर प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा मेढा आगार यांच्याकडून होत आहे.
तर प्रवासी वर्गहो उद्या पासून चालू होणाऱ्या NIGHT EXPRESS ला भरभरून प्रतिसाद द्या.
आणि अजून एक महत्वाचे म्हणजे बऱ्याच प्रवाशांच्या मागणीनुसार आपली गाडी तीन टाकी कोपरखैरणे मार्गे येणार आहे. याची न विसरता नोंद घ्यावी. आता गाडी पकडण्यासाठी रिलायन्स हॉस्पिटल ला न जाता ३ टाकी, गुलाब डेरी येथून गाडी पकडता येणार आहे.
मेढा आगार काटवली - ठाणे - काटवली बस लवकरच आरक्षणास उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे तुम्हाला घरबसल्या ONLINE प्रणाली मार्फत बुकिंग करून आपला प्रवास आरामदायक करू शकता.
मेढा आगार व्यवस्थापक, चालक - वाहक वर्ग, टीम काटवली - ठाणे - काटवली बस.
नवीन वेळापत्रकानुसार ठाणे काटवली बसचे थांब्यावर पोहोचण्याची वेळ खालीलप्रमाणे
ठाणे वंदना :- ००:०५ (१२:०५)
(ठाणे वंदना येथून प्रवास करू इच्छित असणाऱ्या प्रवासी वर्गाने ११:५० पर्यंत थांब्यावर पोहोचावे)
कळवा नाका :- ००:०७
मुकुंद कंपनी :- ००:०९
दिघा :- ००:१३
Mind Space :- ००:१५
(कळवा नाका ते Mind Space येथून प्रवास करू इच्छित असणाऱ्यांनी ००:०५ वाजता थांब्यावर पोहोचावे.)
ऐरोली नाका :- ००:१७
रबाळे पोलीस स्टेशन :- ००:१९
घणसोली नाका :- ००:२३
(ऐरोली नाका ते घणसोली नाका येथून प्रवास करू इच्छित असणाऱ्या प्रवासी वर्गाने ००:१० पर्यंत थांब्यावर पोहोचावे.)
म्हापे :- ००:३३
तीन टाकी/गुलाब डेअरी/कोपरखैराणे :- ००:३५
वाशी हायवे :- ००:४०
(म्हापे ते वाशी हायवे येथून प्रवास करू इच्छित असणाऱ्या प्रवासी वर्गाने ००:२० पर्यंत थांब्यावर पोहोचणे)
मार्गावरील वाहतुकीवर वरील वेळापत्रक असून वाहनांची गर्दी प्रवासी चढउतार दरम्यान लागणाऱ्या वेळेप्रमाणे तसेच मार्गातील अनिश्चित ट्रॅफिक मुळे वेळेत कमी अधिक बदल होऊ शकतो.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / जावली (सातारा)



टिप्पणी पोस्ट करा