अमली पदार्थ मुक्त कराड उपक्रम अंतर्गत कराड शहरात सातारा पोलीस दलाच्या वतीने पोलीस रन मॅरेथॉन स्पर्धा

प्रतिनिधी : राहुल पवार 

कराड : पोलीस दलाच्या वतीने अमली पदार्थ मुक्त कराड हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी पोलीस रन मॅरेथॉन आयोजन करण्यात आले होते आमदार अतुल भोसले यांच्या हस्ते व समीर शेख अधीक्षक सातारा जिल्हा सुरेश भोसले यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. 


स्पर्धा पाच किलोमीटर दहा किलोमीटर आयोजन करण्यात आले होते शिवाजी स्टेडियम मधून स्पर्धेचा शुभारंभ झाला कराड शहरातून स्पर्धा सुरू करण्यात आली वाहतूक केला कोणताही अडथळा नको याची खबर द्यावी घेतली होती कराड शहराचे डी वाय एस पी अमोल ठाकूर व त्यांच्या टीमने या स्पर्धेसाठी विशेष परिश्रम घेतले होते सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नागरिक स्पर्धेत सहभाग घेतला होता हजारो पोलीस स्पर्धेमध्ये सामील झाले होते जवळजवळ 3000 लोक या स्पर्धेत सहभागी होते.


पोलीस दलाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे कराड शहरात मलकापूर परिसर हायवे या ठिकाणी काही वेळा अपघात होत आहेत यावेळी पोलीस दलाने कठोर उपाय योजना वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी असे मत दबक्या आवाजात सर्वसामान्य नागरिक करीत आहेत आमदार अतुल भोसले यांच्या प्रशासकीय बैठकीत काही नागरिकांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.



न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / कराड (सातारा)

Post a Comment

Previous Post Next Post