प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मसूर विद्यालयामध्ये आदीदेव प्रजापिता ब्रह्मा यांचा स्मृतिदिवस साजरा

प्रतिनिधी : राहुल पवार


तणावमुक्त जीवनासाठी प्रजा पिता ब्रह्मा बाबांचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोचवले पाहिजेत -आमदार मनोज घोरपडे

कराड : तालुक्यातील मसूर या ठिकाणी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्यावतीने आ दी देव प्रजापिता ब्रह्मा यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे मनोज घोरपडे उपस्थित होते.


यावेळी त्यांनी प्रजापिता ब्रह्मा बाबा कार्याचा गौरव केला यावेळी शैलेजा दीदी यांनी प्रजापिता ईश्वरी विश्वविद्यालय यांच्या विविध उपक्रमाची माहिती दिली यावेळी बदलत्या युगात सोशल मीडिया व इतर गोष्टीचा युवा यांच्यावरती घातक परिणाम होत आहे.


मानसिक तणाव आरोग्याच्या व्याधी यामुळे अनेक जण त्रस्त आहेत यासाठी ब्रह्मा बाबांनी दिलेली तत्व आत्मसात केली तर मनशांती चा अनुभव घेऊ शकतो आरोग्य आहार याच्यावरती योग्य उपाय योजना केल्या तर बऱ्याच आजारावरती नियंत्रण मिळू शकते. 

इतर अवतीभोवतीच्या घटनेवर मानसिकता अवलंबून आहे यासाठी मनन चिंतन वाचन हे आत्मसात केले पाहिजे असे मत दीदींनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर व्यक्तींनी उपस्थिती दाखवली.यावेळीस्, ब्रह्मा बाबांच्या स्मृति दिना निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. 


प्रजापिता ब्रह्मा बाबा यांच्या स्मृतीस अभिवादन केले. या ठिकाणी 108 तास साखळी यज्ञ गेले 5 दिवस चालू होता त्याची सांगता झाली. या सांगता प्रसंगी उपस्थित राहून आशिर्वाद घेण्याचे भाग्य मिळाले. यावेळी आ. मा.मनोज घोरपडे दादा, जिल्हाध्यक्ष भाजपा मा. धैर्यशील कदम दादा, महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा सरचिटणीस मा.रामकृष्ण वेताळ साहेब, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शासकीय समिती अध्यक्ष दिपाली ताई खोत, मसूर सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात, सुवर्णा दीदी, चिखली गावचे तलाठी लता दीदी मसूर गावचे डॉक्टर अंजली कुराडे मॅडम इतर सेवा केंद्राचे सर्व साधक यांच्या उपस्थिती सोहळा संपन्न झाला. शैलजा दीदी स्वागत केले व ब्रह्माकुमार संतोष भाई यांनी आभार मानले.

न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / कराड (सातारा) 

Post a Comment

Previous Post Next Post