प्रतिनिधी : राहुल पवार
कराड : निळेश्वर येथील बस सेवा सातत्याने कधी चालू कधी बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांचे गैरसोय होत आहे वडोली निळेश्वर हे गाव चारी बाजूने डोंगर मध्ये वसले आहे कराड शहराकडे जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था नाही.
खाजगी वाहतूक वापरल्यास जादा पैसे द्यावे लागतात व ते पण वेळेत उपलब्ध नसते वडोली निळेश्वर पार्ले या गावांचा बससाठी जातात पार्ले या ठिकाणी मागासवर्गीय शासकीय वस्तीग्रह आहे या ठिकाणी बाहेर गावाची विद्यार्थी विद्यार्थिनी दोन्ही गावातील विद्यार्थी ग्रामस्थ यांना शहराकडे जाण्यासाठी प्रवास करावा लागतो कोपर्डे हवेली ते वडोली निळेश्वर हा रस्ता रहदारीचा नसून रस्त्याच्या दोन्ही बाजूला ऊस शेती जास्त आहे.
वस्तीगृहातील व दोन्ही गावातील मुलींना त्रास होत आहे त्यांच्या बाबतीत कोणता अनुचित प्रकार घडू शकतो यासाठी स्थानिक नागरिक वस्तीग्रह प्रशासन सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा बस सेवा सुरू होत नाही अशी माहिती काही ग्रामस्थांनी प्रसारमाध्यमांना दिली.
वडोली निळेश्वर बस सेवा सुरीत सुरू करावी व त्यासाठी नियोजन करावे स्थानिक लोकप्रतिनिधींनी व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे अन्यथा भविष्यामध्ये बस संदर्भात आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे यावेळी अशोक वाघमारे सागर पवार संजय पवार उपसरपंच संभाजी पवार सुभाष नलवडे राजेंद्र नलवडे उपस्थित होते.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / कराड (सातारा)

Post a Comment