जावली तालुक्यातील मालदेव खिंड मार्गे पाचगणी मार्गावर अज्ञातांकडून निसर्ग संपन्न क्षेत्राची अवहेलना

बातमी : श्री.अनिल करंदकर


मार्ली (मेढा) : जावली तालुक्यातील मालदेव खिंड मार्गे पाचगणी रस्त्यावर मार्ली गाव वसलेले आहे. या गावातील लोकांच्या उदरनिर्वाह चे साधन शेती आणि जणावरे यांच्या जीवावर उदरनिर्वाह चालतो. काळाच्या ओघात या घाटमाथ्या वरील गावांचा कायापालट झालेला पहावयास मिळतो मालदेव खिंड मार्गे पाचगणी या रस्त्यालगत जमिनी कवडीमोल भावाने धनदांडग्यांनी विकत घेतल्या आहेत. 


या जागेवर आता हाँटेल्स व्यवसाय सुरु आहेत, या विभागातील देवदीव मार्ली रोड लगत मार्ली गावचे गायरान आहे. या गायरान परिसरात अज्ञातांकडून या जागेत घाणीचे सम्राज्या पसरवले जात असल्याचा येथील स्थानिकांचा आरोप आहे, या गायराणा मध्ये जणावरे चरत असतात सदर जागेवर अज्ञात व्यक्तींनी कचरा टाकल्याचे ग्रामस्थाचे म्हणणे आहे, हा संपूर्ण कचरा प्लॅस्टिक सदृश्य असल्या कारणाने या कायरान परिसरात चरणाऱ्या जणावरांच्या पोटात हा कचरा जाऊन जणावरे दगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.असे मत येथील ग्रामस्स्थानी व्यक्त केले, निसर्गाला हानी पोहोचविणाऱ्या तसेच ग्रामस्थांच्या पशुपालनाला धोका निर्माण करणाऱ्यांवर प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी स्थानिकांकडून मागणी होत आहे.


या कचरा प्रकरणाची मार्ली ग्रामपंचायत सरपंच श्री रामदास गोळे,उपसरपंच श्री बजीरंग गोळे,समीर गोळे ,रामदास गोळे,शामराव गोळे यांनी प्रत्यक्ष पाहाणी केली, यावेळी या घाटा मध्ये अज्ञातांकडून मेलेली जणावरे टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे, व त्यामुळे या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना तसेच स्थानिकांना त्रास होत आहे, प्रशासनाकडून अशा प्रकारचे दुष्कृत्य करणाऱ्यांवर योग्य ती करण्यात यावी आणि या निसर्ग संपन्न क्षेत्राचे सौंदर्य वाचवावे अशी स्थानिकांकडून मागणी होत आहे.

न्यूज मराठी लाईव्ह 
मार्ली / जावली

Post a Comment

Previous Post Next Post