प्रतिनिधी श्री.बजरंग चौधरी
कुसुंबी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेली जावलीची भूमी ही क्रांती, स्वाभिमान, संघर्ष आणि नेतृत्वाची जननी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी पावन झालेल्या या भूमीतून आज कुसुंबी गणात एक सक्षम, निर्भीड व विकासाभिमुख महिला नेतृत्व उभे राहत आहे—ते म्हणजे सौ. रूपाली अंकुश शेलार.
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” हा विचार केवळ इतिहासापुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे नेतृत्व म्हणून रूपालीताई शेलार यांच्याकडे पाहिले जात आहे.
करंडी गावच्या विद्यमान सरपंच म्हणून त्यांनी पदाला केवळ प्रतिष्ठा दिली नाही, तर त्या पदातून विकासाचे नवे मापदंड निर्माण केले. २०१६ साली प्रथमच सरपंचपदाची धुरा स्वीकारताना त्यांनी महिला नेतृत्व हे केवळ आरक्षणापुरते नसून निर्णयक्षम, धाडसी आणि विकासाभिमुख असते, हे ठामपणे सिद्ध केले.
संघर्ष, संस्कार आणि सेवाभाव हा त्यांच्या नेतृत्वाचा पाया आहे. महिला राजसत्ता आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी महिलांच्या प्रश्नांना केवळ वाचा फोडली नाही, तर ठोस उपाययोजनांद्वारे बदल घडवून आणला. पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख म्हणून त्यांनी हजारो महिलांना संघटित करत आत्मविश्वास दिला व नेतृत्व घडवले.
“रयतेचे राज्य म्हणजेच खरे स्वराज्य” या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना कृतीत उतरवताना त्यांनी महिला सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. २०२२ साली सातारा महिला फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड होणे ही त्यांच्या कार्याची पोचपावती मानली जाते. रोजगार, स्वयंरोजगार, बचतगट, प्रशिक्षण, न्याय व सन्मान या सर्व क्षेत्रांत त्यांनी सातत्याने भरीव काम केले आहे.
त्यांना लाभलेला सामाजिक व राजकीय वारसा अधिक समृद्ध करत त्यांनी पुढील पिढीसाठी नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे सासरे श्री.साधू शेलार हे करंडी गावचे दीर्घकाळ सरपंच राहिलेले कणखर नेतृत्व होते, तर ह. भ. प. सर्जेराव ज्ञानदेव शेलार हे समाजप्रबोधनाचे दीपस्तंभ होते. हा वारसा त्यांनी पुढे नेला आहे.
२०२१ साली दुसऱ्यांदा सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर करंडी गावात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला सुविधा, सामाजिक सभागृह आणि विकास आराखड्यांमध्ये ठोस बदल दिसून आले. विकास कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष जमिनीवर उतरलेला दिसून आला.
माननीय छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब विचार मंच, वेण्णा दक्षिण विभाग (२१ गाव समिती) चे अध्यक्ष श्री. अंकुश ज्ञानदेव शेलार यांचे मार्गदर्शन हे त्यांच्या राजकीय वाटचालीस मोठे बळ ठरले आहे. तसेच त्या सौ. वेदांतिका राजे भोसले वहिनीसाहेब यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्या म्हणूनही ओळखल्या जातात.
वहिनीसाहेबांच्या उपस्थितीत करंडी पंचक्रोशीमध्ये झालेल्या सामाजिक, सांस्कृतिक व महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमांमुळे परिसरात नवचैतन्य निर्माण झाले. महिलांना व्यासपीठ, नेतृत्वाची संधी व निर्णयप्रक्रियेत स्थान मिळाले.
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांचे विश्वासू सहकारी म्हणून अंकुश शेलार व रूपाली शेलार हे दाम्पत्य ओळखले जाते. निष्ठा, विश्वास आणि कार्यक्षमतेचा हा संगम आहे.
आज कुसुंबी गणात एकच चर्चा ऐकायला मिळत आहे—
“विकास हवा असेल, महिलांचा सन्मान हवा असेल आणि स्वाभिमानी नेतृत्व हवे असेल, तर रूपालीताई शेलार हाच पर्याय!”
महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून तालुक्यात अनेक महिलांना रोजगार व आत्मनिर्भरतेचा मार्ग मिळाला आहे. हा संघर्ष पंचायत समितीच्या माध्यमातून अधिक व्यापक होणार असल्याचा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
आज कुसुंबी गणातून स्पष्ट मागणी होत आहे की, भारतीय जनता पार्टीने माननीय छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या, जनतेशी नाळ जोडलेल्या व महिला सक्षमीकरणाचे खरे नेतृत्व असलेल्या सौ. रूपाली अंकुश शेलार यांना संधी द्यावी.
ही केवळ निवडणूक नाही—
ही विचारांची लढाई आहे,
स्वाभिमानाची लढाई आहे,
महिलांच्या सन्मानाची लढाई आहे,
आणि ही लढाई जिंकण्यासाठी
कुसुंबी गण सज्ज आहे!
न्यूज मराठी लाईव्ह
कुसुंबी / जावली

Post a Comment