कराड उत्तरमध्ये लोकसहभागाचा उत्सव; रामकृष्ण वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा अभूतपूर्व ओघ

प्रतिनिधी : श्री.अनिल मोरे
कार्यकर्ते व कुटुंबीयांच्या उपस्थितीत रामकृष्ण वेताळ यांनी वाढदिवसाचा केक कापला.

कराड : भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा कराड उत्तर मतदारसंघातील लोकप्रिय नेतृत्व मा. रामकृष्ण वेताळ यांचा वाढदिवस सुर्ली येथे अत्यंत उत्साही, आपुलकीच्या आणि जनसहभागाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ११ ते रात्री ११ या कालावधीत त्यांच्या आनंदराज फार्म हाऊस येथे कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर व सर्वसामान्य नागरिकांनी प्रत्यक्ष भेटी देत शुभेच्छांचा वर्षाव केला. फोन व सोशल मीडियाच्या माध्यमातूनही हजारो शुभेच्छा प्राप्त झाल्या.

वाढदिवसाच्या निमित्ताने मा. वेताळ यांनी सकाळी कुलदैवत श्री. ज्योतिबा (कोल्हापूर) तसेच पाली येथील मार्तंड देवस्थान येथे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संघ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेत सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार छ. उदयनराजे भोसले, मंत्री छ. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ना. जयकुमार गोरे, रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार विक्रांत पाटील, मंत्री भरतनाना पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या.

दिवसभर विविध राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रातील मान्यवर, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी प्रत्यक्ष भेट देत शुभेच्छा दिल्या. जनतेशी घट्ट नातं, सामाजिक जाणिवा आणि कार्यकर्त्यांशी असलेली आत्मीयता यामुळे मा. रामकृष्ण वेताळ यांचा वाढदिवस कराड उत्तर परिसरात पुन्हा एकदा लोकविश्वासाचा आणि सहभागाचा उत्सव ठरला.


न्यूज मराठी लाईव्ह 
कराड / सातारा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने