प्रतिनिधी : श्री.सुनील धनावडे
सातारा
सातारा (जावली) : अंकुश बाबा कदम युवा फौडेशन चे वतीने आज ८ आँगष्ट सोमवारी दु.३ वाजता जावळीची राजधानी मेढा येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रथमच दहीहंडी महिला गोविंदा पथक खास आकर्षण ठरणार आहे.
दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांना ३,३३,३३३ रुपयांची बक्षिसे आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत. १,११,१११ रुपयांचे प्रथम पारितोषिक असून आकर्षक शिल्ड मिळणार आहे आणि सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना आकर्षक रोख रक्कम व शील्ड,सलामी देणाऱ्या महिला गोविंदा पथकांना ५१,००० रुपये व शील्ड अशा प्रकारे पारितोषिके देण्यात येणार आहेत.
मेढा शहरातील जुना एस टी स्टँड जवळ तसेच श्रुतीका चायनिज समोर असलेल्या जुन्या पेट्रोल पंपाच्या ठिकाणी सोमवारी दुपारी हा दहीहंडी सोहळा संपन्न होणार आहे खास बाब म्हणजे उपस्थित प्रेक्षकांसाठी मनोरंजन साठी सम्राज्ञी मयुरी उतेकर याचा महाराष्ट्राची लोकधारा लावणी चा कार्यक्रम होणार आहे .
जिल्ह्यात प्रथमच महिला दहीहंडी पथके सहभागी होणार असल्याने महिलांची विशेष उपस्थिती दहीहंडी सोहळ्याला लाभणार आहे. अंकुश बाबा कदम युवा फाउंडेशनचे वतीने मेढ्यात दहीहंडी उत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे सदर दहीहंडी सोहळ्यात नामवंत गोविंदा पथकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अंकुश बाबा कदम युवा फाउंडेशनचे वतीने करणेत आले आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
सातारा / जावली

Post a Comment