श्री.विक्रम जाधव
प्रतिनिधी / कुडाळ (जावली)
जावली : तालुक्याचा इतिहास गद्दारांनी आमच्या नेत्याला शिकवण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे आराध्य दैवत आहे. शाहू, फुले,आंबेडकर यांचा विचार आम्ही मानणारे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरच त्यांच्या राजघराण्याबद्दल आम्हालाही आदर आहे. त्यामुळे राजकारण समाजकारणाच्या आडून स्वतःची ठेकेदारी चालवून स्वतःचे घर भरणाराने व स्व.विजयराव मोकाशींसह बोंडारवाडी धरण कृती समितीला सातत्याने विरोध करणारांनी आमच्या नेत्याला शिकवण्याची गरज नाही. आ.शशिकांत शिंदे ही व्यक्ती काय आहे हे अवघ्या जावलीकरांबरोबरच सातारा जिल्ह्याला व महाराष्ट्राला माहित आहे.अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष आतिश कदम यांनी दिली.
जावलीचे सुपुत्र आ. शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तमाम जावलीकरांच्या वतीने त्यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन मेढा येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमास जावली तालुक्यातील जनतेची प्रचंड उपस्थिती होती. कार्यक्रमास झालेली गर्दी पाहूनच एका नेत्याला पोटसळ उठला आणि जावलीचा सुपुत्र राज्याचे नेतृत्व करीत असताना कार्यशून्य ठेकेदार बहाद्दर स्वतःला नेता म्हणून घेणारा गद्दार याने प्रसिद्धीपत्र काढून आ.शिंदे यांच्या विरोधात गरळ ओकण्याचा प्रयत्न केला आहे.
खरं तरं म्हसरं राखणाऱ्या गुराख्याला आ. शशिकांत शिंदे यांनीच शिवसह्याद्री पतपेढीत कामाला लावलं मोठ केलं हे ते विसरले? खोट्या कर्ज प्रकरणातून आर्थिक घोटाळे करून स्वतःचा घर भरण्याचा प्रयत्न केला. साहेबांच राजकारण वेगळं आहे. ते व्यक्तीद्वेषाने राजकारण कधीच करत नाहीत. त्यामुळे व्यक्तीद्वेषाचे राजकारण आम्हाला करायला लावू नका असा इशारा आतिश कदम यांनी दिला आहे. काचेच्या बंगल्यात राहणाऱ्याने दुसऱ्याच्या घरावर दगडी मारू नयेत.
आ.शशिकांत शिंदे यांनीच बोंडारवाडी धरणाचा विषय हाती घेतला आहे. स्व.आर. आर.आबा पाटील यांच्या माध्यमातून या विषयाला चालना देण्याचे काम केले. महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थित बैठक झाली. त्यावेळी 1.06 टीएमसी क्षमतेच्या धरणाला तत्वता मान्यता देण्याचा निर्णय झाला होता. यावेळी ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह आ. शशिकांत शिंदे उपस्थित होते.धरणाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून स्व. विजयराव मोकाशी यांनी ५४ गावातील शेतकऱ्यांना घेवून बोंडारवाडी धरणकृती समिती स्थापन केली. या समितीमुळे स्व. विजयराव मोकाशी प्रकाश झोतात आले. त्यांना अडवण्यासाठी व धरणाला विरोध करण्यासाठी बोंडारवाडी धरण निर्माण समिती स्थापन करून वेळोवेळी स्व. विजयराव मोकाशी व समितीमधील पदाधिकाऱ्यांना विरोध करण्याचे काम कोणी केले हे जावली तालुक्यातील तमाम जनतेला माहित आहे.
स्व. विजयराव मोकाशी यांच्या निधनानंतर आयत्या बिळात नागोबा बनणाऱ्या समाज विघातक ठेकेदाराला जनता धडा शिकवेल. एवढा कळवळा आता येतोय तर बोंडारवाडी धरणकृती समितीला विरोध करण्यासाठी दुसरी संघटना का काढली? स्व.विजयराव मोकाशी हयात असताना त्यांना साथ देण्याऐवजी त्यांना सतत विरोध करीत राहिलात. आपल्यामुळे धरणाचे स्वप्न अधुरे ठेवून ते हे जग सोडून गेलेत हे सर्वश्रुत जाहीर आहे.त्यांनी जेवढी आंदोलने केली त्यातील एकाही आंदोलनात सहभागी झाला नाहीत तर ती आंदोलने कशी विस्कळीत होतील याचाच नेहमी प्रयत्न केलात. ट्रायल पिटच्या कामाला विलंब व्हावा व धरणाचे श्रेय आपल्यालाच मिळावे यासाठी विरोधी गावांना भडकवण्याचे काम नेहमी करत आलात..हे जनतेला ठाऊक आहे. निवडणुका आल्या की तुम्हीच जनतेला धरणाचं गाजर दाखवून भुलवण्याच काम करत आहात.
राजकारणाच्या पडद्याआडुन स्वतःच्या फायद्यासाठी ठेकेदारी चालवणाऱ्या जावलीतील गद्दार छोट्या आकाने जावलीच्या स्वाभिमानाच्या गप्पा मारू नयेत.तालुक्यात ज्या राष्ट्रवादी पक्षांने पद दिल, मोठे केलं त्याच पक्षाशी गद्दारी करून पक्षाला अडचणीत आणण्याचे काम आपण केले. त्याने निष्ठेच्या गप्पा मारू नयेत.
आज शेतकरी अडचणीत आहे. ओल्या दुष्काळाबाबत आमच्या नेत्यांने विधिमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठवला पण सत्तेत असणाऱ्यांनी ब्र शब्द काढला नाही.आ. शिंदे जावलीत असताना जी उठवदार विकास कामे झाली ती जनतेला ज्ञात आहेत.मात्र राजकारणात पाहुणा कलाकार आलेल्या व अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्याला ते काय ज्ञात असणार ?
माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत आमचा नेता खंबीर आहे त्याच्याबद्दल बोलण्याचा आपणास अधिकार नाही ? भाजप सरकारनेच माथाडी कायदा रद्द करून माथाडी कामगारांना देशोधडीला पाठविले. माथाडींना कोण लुटत आहे हे कामगारांना माहित आहे. माथाडींचा एवढा पुळका येत असेल तर माथाडी कामगारांना लुटणाऱ्याच्या समर्थनार्थ मोर्चा आपणच काढणार होता. त्यामुळे माथाडींचे प्रश्न सोडविण्यास आ.शशिकांत शिंदे सक्षम आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँक, शिवसहयाद्री पतसंस्था यांच्या माध्यमातून अनेकांच्या नावावर कर्ज काढून स्वतःमज्जा मारणाऱ्याने ज्यांच्या नावावरती कर्ज काढले आहेत त्यांना आज आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे हे ही विसरलात? आंबेघर येथे स्वतःच्या फायद्यासाठी उभे केलेल्या क्रशर कारखान्यामुळे परिसरातील घरांना तडे गेले आहेत. आसपासच्या परिसरातील शेती नापीक झाली आहे. लोकांच्या अन्नात राख मिसळलीत हे कुठे फेडाल पाप?अतिवृष्टीमध्ये रस्ते, पुले, विहिरी, शेती, यांचे अतोनात नुकसान झाले. स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून घेतात तर हे शेतकऱ्यांचे प्रश्न अद्याप का सोडवता आले नाहीत ?
छत्रपती शिवाजीमहाराज हे रयतेचे राजे होते. पण त्याच रयतेच्या शेतजमीनीवर राजघराण्याचे शिक्के कायम करण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला. त्याबाबत आवाज का उठवला नाही. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीजमीनीवर शिक्के आहेत ते उठविण्यासाठी आपण किती प्रयत्न केला. ? आमचे नेते खालच्या पातळीवरचे राजकारण करत नाहीत. पण आम्ही आता तुम्हाला सोडणार नाही. तुमचे अवैध धंदे व निकृष्ट दर्जाचे ठेकेदारी आता उखडून काढल्याशिवाय राहणार नाही. या मतदारसंघाचे आ.बाबाराजे मंत्री झाले याचा तमाम जावलीकरांना अभिमान आहे. तसाच आ.शशिकांत शिंदे साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले याचाही तमाम जावली करांना अभिमान आहे. पण काहीनीं स्वतःच्या स्वार्थासाठी आगीत तेल ओतण्याचे काम केलं.अशा गद्दारांना आगामी काळात तालुक्यातील जनता धडा शिकवेल.आमच्या नेत्यावर आरोप टीका करताना स्वतःची लायकी तपासून पहावी असा इशारा प्रसिद्धी पत्रकाद्वारे आतिश कदम यांनी दिला आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
मेढा / जावली

टिप्पणी पोस्ट करा