प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी
मेढा / जावली
पुणे : दि.१० भाजपाचे जेष्ठ नेते माधव भांडारी संस्थापक अध्यक्ष असलेल्या तसेच संघर्ष नको संवाद हवा या धोरणानुसार धरणग्रस्त,विविध प्रकल्प ग्रस्थांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या जनजागर प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या राज्य सचिवपदी जावली भाजपचे माजी अध्यक्ष श्रीहरी गोळे यांची पुणे येथे झालेल्या बैठकीत नियुक्ती करण्यात आली. माधवजी भांडारी यांचे अध्यक्षतेखाली तसेच देवराज देशमुख नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्त बांधवांसाठी गेली १० ,१२ वर्षे श्रीहरी गोळे संघटनेत काम करत आहेत. त्यांची *राज्याचा सचिव* म्हणून जबाबदारी दिली.
या पूर्वी श्रीहरी गोळे यांनी महू हातगेघर प्रकल्पग्रस्थांच्या विविध प्रश्नावर वेळोवेळी आवाज उठवून धरण ग्रस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला आहे. महू हातगेघर प्रकल्प ग्रस्थांना एकरकमी पॅकेज मिळवून देणे, भूखंड तसेच जमीन वाटप करून घेणे, उदर निर्वाह भत्ता मिळवून देणे, कुटुंबातील एका व्यक्तीला प्रकल्पग्रस्त दाखला मिळवणे. नियोजनात नसलेल्या हातगेघर सारख्या गावाला उपसा सिंचन योजनेचा पाठपुरावा करणे. कृष्णा खोरे आणि धरणग्रस्त बाधित लोकांमध्ये समन्वय ठेवणे. महू हातगेघर च्या कॅनल बाधित शेतकऱ्यांना पीक पाणी नुकसान भरपायी मिळवून देणे. अशी विविध कामे जनजागर प्रतिष्ठाण च्या माध्यमातून केलेली आहेत.
त्याचीच पोहच पावती म्हणून माधव भांडारींनी राज्याचे सचिव म्हणून जबाबदारी दिल्याचे राज्य अध्यक्ष देवराज देश्शमुख म्हटले. यावेळी पुनर्वसन प्राधिकरणाचे विभागीय सदस्य जगन्नाथ विभुते, सातारा जिल्हा समन्वयक जितेंद्र पाटील, पुणे जिल्हा समन्वयक हणमंत कंक, रायगड उत्तर जिल्हा समन्वयक सतिश जाधव,जगन्नाथ पाटील,परशुराम मिरकुटे, श्रीरंग पाटील, रायगड दक्षिण समन्वयक दिलीप गायकवाड,आडवोकेट निलेश यादव, राजेश पोळ, योगेश प्रबळकर, अशोक गोळे, महेश मानकुमरे,मिलिंद राणे, कृष्णा शेलार, अभिजित भोसले, शिवाजी पाटील, दीपक शिंदे, मनोहर वाघ, राजीव पाटील, यावेळी सातारा, पुणे, रायगड इत्यादी जिल्ह्यातील कोयना, कण्हेर, धोम, महू हातगेघर, वांग -मराठवाडी, उरमोडी, तारळी इत्यादी तसेच निरा देवधर, मोरबे प्रकल्पग्रस्थांचे विविध नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्युज मराठी लाईव्ह
मेढा / जावली

Post a Comment