नीलगायीच्या धडकेत एका शिक्षकाचे दुर्दैवी निधन झाल्याची घटना समोर येत आहे. शाळा सुरू होणाच्या एक दिवस अगोदर विद्यार्थ्यांच्या लाडक्या गुरूजींना गमावले. शाळेसह गावातही शोककळा पसरली आहे.
हिंगोली : नीलगायीच्या धडकेत जिल्हा परिषद शिक्षकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हिंगोली ते सेनगाव महामार्गावरील ब्रह्मपुरी पाटी शिवारात (15) रविवार सकाळी नऊ वाजताच्या सुमारास सुनील आनंदराव कोटकर (37) रा.वरुड चक्रपान येथील शिक्षकाचा नीलगायीच्या धडकेत मृत्यू झाला आहे.
सविस्तर माहिती अशी की, उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून शाळांना सुरुवात होणार म्हणून सर्व तयारीनिशी गावाकडून हिंगोलीकडे आपल्या आईंसोबत दिलेले संसार उपयोगी साहित्य घेऊन सुनील आपल्या घरून दुचाकी वरून असताना वाटेत नीलगायीच्या पाठीमागे कुत्रे धावत असल्याने नीलगाय अचानक सुनील यांच्या गाडीवर येऊन धडकली ही धडक एवढी भीषण होती की,या धडकेत सुनील यांचे हात व पाय जागीच निकामी झाले होते तर डोक्यावर हेल्मेट असूनही डोक्याला मोठ्या प्रमाणावर इजा झाली होती. अपघात झाल्यानंतर तातडीने उपचारासाठी त्यास हिंगोलीला नेण्यात आले प्राथमिक उपचार करून नांदेडला उपचारासाठी हलविण्यात आले होते तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
प्रेमळ स्वभाव मायाळूवृती, सर्वांसोबत हसत खेळत वावरणारे व अभ्यासू विद्यार्थ्यांचा आवडता शिक्षक म्हणून त्यांच्याकडं बघीतल जायचं गरीबीची जाण असलेले सुनील यांची कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम नेमणूक झाली होती व बदली वरून ते 2017 मध्ये हिंगोलीच्या सरकळी जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत होते. उन्हाळा सुट्टी संपली आहे म्हणून व आपल्या शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यांना उद्यापासून आपल्याला भेटायचं आहे त्यांच्या सोबत गमती जमती करायच्या आहेत आपण शिकवलेला अभ्यास चिमुकल्यांना विचारायचा आहे त्यांच भविष्य उज्ज्वल करायचं आहे. असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात घेऊन सुनील आपल्या आईंसोबत दिलेले साहित्य घेऊन निघाला होता मात्र रस्त्यात काळ आपली वाट बघतोय हे सुनील यांना माहीत नव्हत.
न्युज मराठी लाईव्ह
हिंगोली