श्री.अनिल मोरे
प्रतिनिधी / कराड (सातारा)
कराड (सातारा) : येथील सुनील चौगुले हे आपल्या व्यवसाय निमित्त मुंबई ठाणे येथे गेले असता, त्यावेळी त्यांच्या छातीत अचानक दुखत असल्यामुळे त्यांचे जावई रोहित भोसले यांनी पाहुणे डॉ. नरेश मोरे यांना फोन द्वारे कळवून त्यांच्याकडून पुढील उपचारासाठी सल्ला घेतला.व तसेच डॉ. नरेश मोरे यांनी त्यांना गॅलेक्सी हॉस्पिटल ठाणे येथे ऍडमिट करण्यास सांगितले. आणि तेथील डॉक्टरांशी तात्काळ उपचार करण्यासाठी फोन द्वारे संपर्क साधला.
त्यानंतर रुग्ण सुनील चौगुले, यांचे जावई रोहित भोसले, यांनी पाहुणे डॉ. नरेश मोरे यांना फोन द्वारे रुग्ण सुनील चौगुले यांची अतिशय गरीब बिकट परिस्थिती असल्यामुळे ऑपरेशनला लागणारे तीन लाख रुपये इतकी रक्कम नसल्याचे सांगितले.त्यावर डॉ. नरेश मोरे यांनी त्यांना गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये थोडे पैसे डिपॉझिट करून, प्रथम सुनील चौगुले यांच्या उपचाराला सुरुवात करूया, असा सकारात्मक आधार दिला.व रोहित भोसले यांनी रुग्ण सुनील चौगुले यांना गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.
त्यांच्याकडे असणारे थोडी रक्कम हॉस्पिटल मध्ये डिपॉझिट केली.मंग लगेचच रुग्ण सुनील चौगुले यांना तेथील डॉक्टरांनी तत्काळ एन्जोप्लास्टी ऑपरेशनसाठी तयारी दर्शवत त्यांची एन्जोप्लास्टी ऑपरेशन करण्यास सुरुवात केली.ऑपरेशन काही तासातच यशस्वीरित्या पार पडल्यानंतर डॉ. नरेश मोरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून १ लाख रुपये आणि सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून २५ हजार अशी एकूण मिळून 1 लाख २५ हजार रुपयांची मदत रुग्ण सुनील चौगुले यांना हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी मिळवून दिली आहे.त्याबद्दल सुनील चौगुले यांनी मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे आणि देवासारखे धावून येणारे डॉ. नरेश मोरे सर,डॉ. सागर सर यांचे मनापासून खूप खूप आभार मानले आहेत.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी : कराड / सातारा

Post a Comment