श्री.संजय वांगडे
प्रतिनिधी / मेढा (जावली)
मेढा (जावली) : भैरवनाथ तालीम संघ मेढा येथील पैलवान अथर्व दळवी याने मेढा यात्रा कुस्ती मैदानात कुस्ती चितपट करत मानाची गदा पटकावली. शूरवीरांचा जावली तालुका आणि या जावली तालुक्यातील दुंद गावचे सुपुत्र संतोष दळवी यांचे चिरंजीव पैलवान अथर्व दळवी याने मेढा यात्रा कुस्ती मैदानावर आपल्या पैलवानकिची कलाकृती दाखवत कुस्ती चितपट केली.
भैरवनाथ तालीम संघाचे वस्ताद राहुल मानकर, कुस्ती मल्लविद्या जावली तालुका अध्यक्ष अरुण जवळ बापू शामबाबा धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मेढा भैरवनाथ तालीम संघ परिसरातील सर्व पैलवान यांना मार्गदर्शन दिले जाते. महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री नामदार श्री. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थिती दाखवली. तसेच यात्रा कमिटी मेढा यांच्या देखरेखीखाली कुस्ती आखाड्याचे योग्य असे नियोजन केले गेले होते.
या मैदानात पोस्टर वरच्या अनेक कुस्त्या लावण्यात आल्या होत्या ढाल तसेच रोख बक्षिसे पैलवानांना वाटण्यात आले. डोळ्याची पारणे फिरतील असा हा अविस्मरणीय कुस्त्यांचा आखाडा प्रेक्षणीय ठरला. या कुस्त्यांच्या आखाड्यामध्ये मानाच्या गदेचा मानकरी अथर्व दळवी ठरला. ही मानाची गदा पृथ्वीराज दळवी यांच्यामार्फत ठेवण्यात आली होती.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / मेढा (जावली)


Post a Comment