युवकांनो राष्ट्र उभारणीसाठी सकारात्मक विचारांची गरज - गोवा विधानसभा सभापती डॉ.रमेश तवरकर

श्री.अनिल मोरे
प्रतिनिधी / कराड


कराड : युवकांनो राष्ट्र उभारणीचा इतिहास पाहिला तर समाजातील साधारणत: २० टक्के लोक शाहू फुले आंबेडकर या महापुरुषांचा आदर्श, डोळ्यासमोर ठेवून,आणि अलीकडच्या काळामध्ये पंडित जवाहलाल नेहरू, वल्लभभाई पटेल,अटल बिहारी वाजपेयी, एपीजे अब्दुल कलाम, मनमोहन सिंग,नरेंद्र मोदी या नेत्यांचे राष्ट्र उभारणीसाठी चे कार्य आणि ऊर्जा, पाहून आजची 20 टक्के युवा पिढी समाज उभारणीचे काम करत आहे. 


त्यामुळे सकारात्मक लोकांच्या संख्येत वाढ करण्याचे काम या २० टक्केवाल्यांकडे असते. जगात सर्व करणे शक्य आहे, हा विश्वास बाळगा. नकारात्मक विचार सकारात्मकतेकडे वळवा, यशस्वी व्हाल. कष्ट घ्या, समाजासाठी वैयक्तिक योगदान द्या. विद्यार्थ्यांनी राष्ट्रउभारणीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. समाजातील १० टक्के तरुण नोकरी देणारे झाले तर देशविकासात भर पडल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन गोवा विधानसभेचे सभापती डॉ. रमेश तवरकर यांनी कराड येथील एका कार्यक्रमात केले. कृष्णा बचाव चळवळीला १२ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले.    


डॉ. रमेश तवरकर हे डॉ. दौलतराव आहेर इंजिनिअरिंग कॉलेज,कराड येथे विद्यार्थ्यांना‘राष्ट्रउभारणीत युवकांचे योगदान’ या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी नवचेतना युवा मंच, गोवा चे अध्यक्ष कृष्णा पालेकर, कॉलेजचे संस्थापक डॉ. अशोक गुजर, माजी क्रीडा उप संचालक टेकाळे, प्राचार्य अन्वर मुल्ला आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर स्वागत गीत सादर करणायात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कृष्णा पालेकर म्हणाले, डॉ. रमेश तवरकरांच्या श्रमधाम संकल्पनेचे पंतप्रधानांकडून कौतुक करण्यात आले. त्यांनी गोव्यात लोकोत्सव परंपरा राबवली. तसेच कृष्णा बचावच्या सामाजिक लढ्याला सुयश चिंतत आहे.

डॉ. अशोक गुजर यांनी गुजर हॉस्पिटलच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच आमच्या हॉस्पिटलमध्ये गरिबांना अल्पदरात किंवा मोफत उपचार केले जातात असे सांगून कृष्णा बचाव चळवळीला आमच्या शुभेच्छा आहेत, असेही सांगितले.

प्रमुख पाहुणे डॉ. रमेश तवरकर म्हणाले, विद्यार्थ्यानी समाजकारणावर भर द्यायला हवा. विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षणाची आज गरज आहे. समाजातील तळागाळातील लोकांसाठी, त्यांच्या हक्कासाठी समाजकार्य करण्याची गरज आहे. सकारात्मकता तुम्हाला यशाकडे घेऊन जाते. विद्यार्थ्यानी राष्ट्रउभारणीत योगदान द्यावे.

यावेळी राहुल पवार यांनी कृष्णा बचाव चळवळीबद्दल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला इंद्रजीत गुजर, आबासाहेब चव्हाण, अशोक सुतार, कुलदीप मोहिते, अनिल मोरे, मसूर ब्रह्माकुमारी सेंटरचे प्रमुख ब्रह्मकुमार संतोष भाई, विजय जगतापसह शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते,


न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / कराड (सातारा)

Post a Comment

Previous Post Next Post