मालिकाविश्वातून एक धक्कादायक बातमी आली आहे. टीव्ही मालिका 'अप्पी आमची कलेक्टर' फेम टीव्ही अभिनेता संतोष हणमंत नलावडे यांचे निधन झाले.
सातारा : मालिकाविश्वातून एक धक्कादायक बातमी आली आहे. टीव्ही मालिका 'अप्पी आमची कलेक्टर' फेम टीव्ही अभिनेता संतोष हणमंत नलावडे यांचे निधन झाले आहे. नांदेड येथे रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाला. संतोष अवघ्या ४९ वर्षांचे होते.
ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात रेकॉर्ड विभागात कार्यरत होते. नांदेड येथे विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी गेले होते. तेथे त्यांचा अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
उपचार सुरू असताना आज (सोमवारी) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर वाढे (ता. सातारा) या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांचा मित्र परिवार मोठा होता.
हौशी नाटकांमधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या संतोष यांनी अप्पी आमची कलेक्टर, शेतकरी नवरा हवा, लाखात एक आमचा दादा, मन झालं बाजींद, कॉन्स्टेबल मंजू, लागीर झालं जी आदी मालिकेतही काम केले होते, तसेच त्यांनी विविध मराठी चित्रपटांमध्ये सहकलाकार म्हणून काम केले होते.
न्युज मराठी लाईव्ह
सातारा

Post a Comment