प्रतिनिधी : श्री.गणेश मंडपे
आष्टी (जालना) : दिनांक 02.02.2025 रोजी 03.30 वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाणे आष्टी हद्दीमध्ये लोणी शिवारामध्ये सलीम जैनोद्दीन शेख वय 45 वर्षे व्यवसाय चिकन दुकान चालक रा.लोणी ता.परतुर जि.जालना यांचे व आरोपी 1. कृष्णा अर्जुन खरात रा.गुंज ता. घनसावंगी जि.जालना यांचे वडील यांच्यामध्ये पैशाचे देवान घेवाणीचा वाद असल्याने आरोपी व त्याचे दोन इतर साथीदार त्यांच्याकडील रॉयल एनफिल्ड दूचाकी वरुन सलीम जैनोद्दीन शेख यांच्याकडे आले व जुन्या वादाचे कारण काढुन आरोपी कृष्णा अर्जुन खरात याने देशी कट्टा काढुन राउंड फायर केले.
त्यानंतर सदर इसम हे त्यांच्याकडील वर नमुद मोटार सायकल वरुन आष्टीकडे पळुन जात असल्याची माहिती पोलीस ठाणे आष्टीचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. सचिन इंगेवाड यांना समजताच त्यांनी वरीष्टांना माहिती देवुन जालना जिल्ह्यासह पोलीस स्टेशन आष्टी हद्दीत वेगवेगळया ठिकाणी नाकाबंदी लावली असता, वरील आरोपी नमुद बुलेट मोटारसायकल सह आष्टी बस स्टँड जवळ आल्याचे दिसताच पोलीसांनी त्यांना पाठलाग करून पकडले असता कृष्णा खरात यांचेसोबत आरोपी 2. भगवान रविंद्र तसनुसे वय 23 वर्षे रा.गुंज ता. घनसावंगी जि. जालना व एक अल्पवयीन बालक असे व त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल क्रमांक MH 21 CD 4818 व एक देशी पिस्तुल, 2 मॅगझीन 8 जिवंत काडतुस, 3 वापरलेले काडतुस मिळुन आले ते जप्त करण्यात आले आहेत. आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन आष्टी येथे गुरनं /2025 कलम 109 भा.न्या.सं. सह कलम 3/25 म.ह.का. प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक, आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन इंगेवाड, पोउपनि अजित चाटे, पोलीस शिपाई शाम पांढरपोटे, पोशि गणेश शिंदे, पोशि गोकुळ देवळे, पोशि डिगाबंर बादाडे, पोशि राणुजी पांढरे, पोशि दिपक पवार, पोशि दिपक सोनुने, पोशि पानजंजाळ चापोह राहुल वाघमारे यांच्या पथकाने केली.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / आष्टी (जालना)

Post a Comment