द युवा ग्रामीण पत्रकार संघ जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

बातमी : श्री.विलास दरेकर


सातारा : जावली तालुक्यातील श्री.किशोर दिलीप दरेकर आणि श्री.राजकुमार साहेबराव दरेकर यांना उद्योग भूषण तसेच सौ.मंगल सुरेश सोनवणे यांना आदर्श अंगणवाडी सेविका तर सौ.स्वाती मंगेश वैद्य यांना आदर्श उद्योग भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.


द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या मार्गदर्शनात द युवा ग्रामीण पत्रकार संघ सातारा जिल्हा यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्ती व संस्थांचा जिल्हास्तरीय द युवा ग्रामीण पुरस्कार २०२५ देऊन गुणगौरव करण्यात आला.


हा पुरस्कार सोहळा सुरभी मंगल कार्यालय सातारा येथे शुक्रवार दि.३१ जाने. २०२५ रोजी द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अन्सार शेख, उपाध्यक्ष र जीवन मोहिते, प. महा. अध्यक्ष न प्रमोद शिंदे, संपर्कप्रमुख बाळासाहेब कोठुळे, पुणे जिल्हा अध्यक्ष शकिल न मन्यार, महिला अध्यक्षा सातारा अर्चना जगताप


बालविकास प्रकल्प वे अधिकारी सातारा संदीप भिंगारे न साहेब, सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी - नितीन तारळकर साहेब, सातारा व तालुका पोलीस ठाणे पो.नि.निलेश ने तांबे साहेब, सहा. पो. उपनिरीक्षक र सातारा शशिकांत गोळे साहेब , मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अध्यक्ष खोत मॅडम


रहिमतपूर भाजपा महिला अध्यक्षा अंजली जाधव, श्री.विलास दरेकर जावली तालुका अध्यक्ष आदी मान्यवरांसह द युवा ग्रामीण पत्रकार संघांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्सहात संप्पन्न झाला. सातारा जिल्ह्यासह महाष्ट्रातील विविध क्षेत्रातील १०३ नामवंतास यावेळी मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. जवळपास ५०० लोकांच्या उपस्थितीत मोठया दिमाखात हा पुरस्कार सोहळा पार पडला.



न्यूज मराठी लाईव्ह 
सातारा

Post a Comment

Previous Post Next Post