कराड तालुक्यात डिजिटल मीडिया संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष कदम यांची निवड

 कराड प्रतिनिधी | श्री.अनिल मोरे

कराड : तालुक्यातील डिजिटल मीडिया संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी संतोष कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे पत्रकारिता क्षेत्रात समाधानाची भावना व्यक्त केली जात आहे. संतोष कदम हे ‘एस. के. क्राइम न्यूज’ चॅनेलचे संपादक म्हणून कार्यरत असून, त्यांनी डिजिटल माध्यम क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

ही नियुक्ती लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आयोजित अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संघाच्या अधिवेशनात जाहीर करण्यात आली. संघाचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या उपस्थितीत संतोष कदम यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या वेळी शरद गाडे, तन्मय पाटील, महेश चव्हाण, श्रीकांत महाडिक, प्रतीक पाटील आणि वैभव कुलकर्णी यांसह अनेक पत्रकार उपस्थित होते.

नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर संतोष कदम यांनी कराड तालुक्यातील डिजिटल मीडिया क्षेत्र अधिक संघटित व सक्षम करण्याचा मानस व्यक्त केला. पत्रकारांच्या विविध समस्यांवर तोडगा काढत त्यांना एकत्र आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संतोष कदम यांच्या निवडीबद्दल सातारा व सांगली जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.



न्यूज मराठी लाईव्ह | कराड / सातारा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने