पाटण येथे भारतीय बौद्ध महासभेची नूतन कार्यकारिणी जाहीर


पाटण : बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा (संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर) यांच्या वतीने पाटण तालुक्याची नूतन कार्यकारिणी निवड जाहीर करण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दि. २५/१२/२०२५ रोजी दुपारी १ वाजता पाटण येथील सर्किट हाऊस येथे करण्यात आले आहे.

या निवड प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धीरज जाधव, उपाध्यक्ष एकनाथ रोकडे, राज्य कोषाध्यक्ष वसंत चव्हाण (गुरुजी), सातारा जिल्हा अध्यक्ष कुमार सुर्वे, जिल्हा महासचिव दशरथ कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष दत्तात्रय जाधव, जिल्हा महिला अध्यक्ष द्रक्षाताई खंडकर, जिल्हा पदाधिकारी गौतम माने, भानुदास सावंत, प्राध्यापक रविंद्र सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

यावेळी पाटण तालुक्यातील नूतन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात येणार असून, संघटनात्मक बांधणी व सामाजिक कार्याला बळकटी देण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

या कार्यक्रमास पाटण तालुक्यातील सर्व श्रावणेर, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, समता सैनिक, तसेच धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील सर्व बौद्ध बांधव-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समाजरत्न राहुल रोकडे, पाटण तालुका निमंत्रक यांनी केले आहे.

न्यूज मराठी लाईव्ह 
पाटण / सातारा

Post a Comment

Previous Post Next Post