चैत्यभूमीचे शिल्पकार यशवंत (भैय्यासाहेब) भीमराव आंबेडकर यांची जयंती उत्साहात संपन्न


सातारा : बौद्धचार्यांचे जनक म्हणून ओळखले जाणारे तथा चैत्यभूमीचे शिल्पकार यशवंत उर्फ भैय्यासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा व सातारा तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी येथे मोठ्या श्रद्धा व आदरपूर्वक संपन्न झाली.

कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा अध्यक्ष आयु. कुमार सुर्वे गुरुजी, तसेच महिला जिल्हा अध्यक्षा आयु.नि. द्राक्षा ताई खंडकर मॅडम उपस्थित होते. स्थानिक केंद्रीय शिक्षक व बौद्धचार्य आयु. पोपट रणबागले गुरुजी यांच्यासह उपस्थित सर्व उपासक-उपासिका यांनी भैय्यासाहेबांना अभिवादन करून त्यांचे स्मरण केले.

यावेळी धम्म उपासिका आयु.नि. नीता रणबागले यांनी अल्पोपहार दान देऊन जयंती सोहळ्यास सेवाभावाने योगदान दिले.

कार्यक्रमाची सांगता धम्म पालन गाथा व सरणतय घेऊन शांत, अनुशासित वातावरणात करण्यात आली. बौद्ध समुदायाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून भैय्यासाहेबांना विनम्र अभिवादन केले.

न्यूज मराठी लाईव्ह 
सातारा 

Post a Comment

Previous Post Next Post