शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मरणार्थ आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन

प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी

मेढा (जावली) : दि.२६ आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा यांच्या वतीने २६ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जावळी तालुक्यातील *केडंबे गावचे सुपुत्र शहीद तुकाराम ओंबळे* यांच्या स्मरणार्थ सायकल रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले.


या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे व शहीदांच्या बलिदानाची प्रेरणा देणे हा होता. रॅलीचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्हि गिरी सर यांनी शहीद ओंबळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले.


सायकल रॅली मेढा येथून सुरू होऊन त्यांच्या केडंबे गावापर्यंत नेण्यात आली. मार्गात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत शौर्याचा संदेश दिला. गावकऱ्यांनी उत्साहाने स्वागत करून शहीद ओंबळे यांच्या स्मृतीला अभिवादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारीरिक शिक्षण संचालक डॉ. प्रमोद चव्हाण यांनी केले. त्यांनी २६/११ हल्ल्याची पार्श्वभूमी आणि शहीद ओंबळे यांचे बलिदान विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडले.

प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्हि गिरी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “शहीद तुकाराम ओंबळे यांचे योगदान राष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णपान आहे".*त्यांच्या शौर्यातून प्रत्येक विद्यार्थ्याने प्रेरणा घ्यावी.”
यानिमित्ताने मेढा येथील ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी व 
वैद्यकीय पथक यांनी ॲम्बुलन्स सह सायकल रॅलीच्या मार्गावर आपत्कालीन आरोग्य सेवा देण्यासाठी नियोजन केले होते. 

तसेच या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे आरोग्य तपासणी शिबिराचे ग्रामीण रुग्णालय मेढा यांचे वतीने आयोजन करण्यात आले. मेढा पोलीस स्टेशन यांचे अधिकारी व कर्मचारी तसेच महाविद्यालयाचे शिक्षकवर्ग व स्थानिक नागरिकांचे विशेष सहकार्य लाभल्याने रॅली यशस्वी झाली. विद्यार्थांनी सायकल रॅलीमधे मोठ्या उत्साहाने भाग घेतला. हा उपक्रम विद्यार्थ्यांना देशभक्ती, सामाजिक जाणीव तसेच कर्तव्यभावनेची प्रेरणा देणारा ठरला.


न्यूज मराठी लाईव्ह 
मेढा / जावली 

Post a Comment

Previous Post Next Post