कुडाळ पंचशील नगर येथे भारतीय संविधान गौरव दिन उत्साहात साजरा


कुडाळ (जावली) : भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा आणि जावली तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने पंचशील नगर, कुडाळ येथे भारतीय संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाच्या मुख्य सत्रात भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्ह्याचे नूतन अध्यक्ष आयु. कुमार सुर्वे यांचा भारतीय बौद्ध महासभा जावली व पंचशील नगर उपासक—उपासिका यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.


संविधान तज्ञ आयु. तेजस कांबळे यांनी संविधानातील महत्वाचे मुद्दे, मूलभूत अधिकार, कर्तव्ये व सामाजिक समानतेवरील विचार उपस्थितांसमोर सोप्या भाषेत मांडले. तसेच भारतीय बौद्ध महासभा जावलीच्या वतीने पंचशील नगरातील विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात शर्मिला कांबळे यांच्या वतीने सर्व उपस्थितांना खीरदान देण्यात आले.

या निमित्ताने सातारा जिल्हा कोषाध्यक्ष आयु. दत्तात्रय जाधव यांनी संविधान प्रत वाचून दाखवीत सर्वांना संविधानाचे महत्व पटवून दिले आणि प्रत्येक उपस्थिताला संविधान प्रत देऊन संविधानाचे पालन करण्याची प्रेरणा दिली.

कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून आयु. कुमार सुर्वे (जिल्हाध्यक्ष), आयु. तेजस कांबळे, आयु. दशरथ कांबळे (जिल्हा महासचिव), आयु. दत्तात्रय जाधव (जिल्हा कोषाध्यक्ष), आयु. संतोष खरात (जावली तालुका अध्यक्ष), आयु. प्रमोद मोतलिंग (वाई तालुका सचिव) यांची उपस्थिती लाभली.

तसेच पंचशील नगरातील आयु. उत्तम देवकर, आयु. दत्तात्रय कांबळे, संदीप कांबळे, प्रशांत शिंदे, चंद्रकांत कांबळे, प्रविण कांबळे, मनोज कांबळे, भानुदास कांबळे, वसंत गायकवाड, बजरंग खंकाळ, संतोष कांबळे (बलकवडी) तसेच महिला उपासिका जयश्री कांबळे, उषा कांबळे, शर्मिला कांबळे, शैला कांबळे, करण कांबळे, प्रणव कांबळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समन्वय निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर शेवटी आभार भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा महासचिव आयु. दशरथ कांबळे यांनी मानले.

न्यूज मराठी लाईव्ह 
कुडाळ / जावली 

Post a Comment

Previous Post Next Post