डॉ.बी.के.सुवर्णा यांना मलेशियात इंटरनॅशनल वुमन्स लिडरशिप अवॉर्ड 2025 प्रदान करण्यात आला

प्रतिनिधी / अनिल मोरे


सातारा (कराड) : नागठाणे येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या प्रमुख संचालिका डॉ.बी.के.सुवर्णा यांना मलेशियात क्वाललंपूर येथील हिल्टन हॉटेल मध्ये आयोजित कार्यक्रमात प्रिन्सेस रोमेना मुराद यांच्या हस्ते इंटरनॅशनल वुमन्स लीडरशिप अवॉर्ड 2025 मोठ्या सन्मानाने प्रदान करण्यात आला. 

त्या १०० विश्वविक्रम करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला म्हणून त्यांची ओळख आहे. डॉ. बी.के.सुवर्णा अनेक वर्षापासून भारताच्या प्राचीन राजयोगाचा प्रसार व प्रचार करत आहेत. तसेच राज योगाच्या माध्यमातून आजच्या युवा पिढीला ताण तणाव व व्यसनापासून मुक्त करण्यासाठी भारतासह इतर देशांमध्ये सुद्धा प्रचार व प्रसार करत असतात. याचीच दखल घेऊन यापूर्वीही त्यांना जगभरात विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदनचा वर्षाव होत आहे.


न्यूज मराठी लाईव्ह 

कराड / सातारा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने