📰 जावली तालुक्यात समाजकार्यत ‘महालक्ष्मी ट्रस्ट’ अग्रेसर

 प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी


केळघर, (जावली) : दि. २५ जावली तालुक्यातील केडंबे व केळघर पंचक्रोशीतील तरुणांनी तीन वर्षांपूर्वी स्थापन केलेली आई श्री महालक्ष्मी ट्रस्ट आज समाजकार्याच्या क्षेत्रात भक्कमपणे उभी राहिली आहे. स्थापनेची तिसरी वर्षपूर्ती साजरी करत असलेल्या या ट्रस्टने अल्पावधीत विविध उपक्रमांद्वारे तालुक्यातील महिलांना, विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्यांना हातभार लावला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही ६ डिसेंबर २०२५ रोजी ट्रस्टतर्फे तालुक्यातील २५० महिलांची पंढरपूर वारी आयोजित करण्यात आली आहे. गेली तीन वर्षे जावली खोऱ्यातील महिलांना मोफत देवदर्शन घडवून आणण्याची परंपरा ट्रस्टने जपली आहे.

भागातील तरुणांना एकत्र करून तालुक्याचा विकास साधण्यासाठी ही संस्था सातत्याने कार्यरत आहे. स्वर्गीय विजयराव मोकाशी (जलनायक) यांच्या बोण्डरवाडी धरणाच्या आंदोलनातही ट्रस्ट, महामंडळ आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.

शैक्षणिक क्षेत्रातही ट्रस्टचे योगदान लक्षणीय आहे. केडंबे पंचक्रोशीतील २० शाळकरी मुलींचे दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक पाठबळ दिले जात आहे. याशिवाय दरवर्षी १५० हून अधिक शालेय बॅग, वह्या व साहित्य विद्यार्थ्यांना मोफत वाटप केले जाते. शिक्षकांनाही आवश्यकतेनुसार मदत करण्यात येते.

संस्थेच्या मुंबईस्थित कार्यकर्त्यांमार्फत दरवर्षी मोफत अन्नदान शिबीर आयोजित केले जाते.

सण २०२३ मध्ये कोल्हापूर महालक्ष्मी देवस्थान, तर २०२४ मध्ये मोरगाव गणपती व जेजुरी खंडोबा येथे महिलांच्या सहली आयोजित करून धार्मिक पर्यटनालाही चालना दिली आहे.

केळघर–मेढा विभागात युवकांच्या सहकार्यातून महालक्ष्मी ट्रस्ट आज एक विश्वासार्ह आणि नावाजलेली सामाजिक संस्था म्हणून उदयास आली आहे.



न्यूज मराठी लाईव्ह 

केळघर / जावली

Post a Comment

Previous Post Next Post