प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी
कुडाळ (जावली) : रानगेघर, आलेवाडी, पदुमले मुरा, धनगरवाडी, शेडगेवाडी, रेंडिमुरा, धोंडेवाडी, मानकरवाडी,ढेबेवाडी, दरे बुद्रुक, करंदोशी, नेवेकरवाडी या पंचक्रोशीची मीटिंग वसंतराव मानकुमरे भाऊ , सौरभ बाबा शिंदे, संदीप परामने,यशवंत आप्पा भालेघरे यांच्या उपस्थितीत पार पडली.
सदर मीटिंग मध्ये पंचक्रोशीच्यावतीने मानकुमरे भाऊ यांनी जिल्हा परिषदला म्हसवे गटातून उभे रहावे अशी विनंती करणेत आली, तसेच आजपर्यंत या विभागाला संधी मिळाली नाही म्हणून पंचायत समितीचे तिकीट या विभागामध्ये देण्यात यावे यासाठी आग्रही मागणी करण्यात आली.
यासंदर्भात लवकरच नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना भेटून वरील दोन्ही मागण्या करण्याचे ठरले आहे याप्रसंगी भाजपा उपाध्यक्ष विकास धोंडे, प्रतापगड कारखाना एम डी राजेंद्र भिलारे, दरे सरपंच संतोष महामुलकर, सोसायटी चेअरमन रवींद्र महामुलकर, संजय पवार, करंदोशी उपसरपंच प्रमोद कांबळे , चेअरमन नामदेव नेवेकर, दिलीप महामुलकर, सचिन महामुलकर, जीवन भोसले, काशिनाथ पार्टे, मारुती ढेबे, संतोष धोंडे, शंकर हिरवे, शांताराम मानकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यूज मराठी लाईव्ह
कुडाळ / जावली

Post a Comment