प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी
मेढा (जावली) : जावळी तालुका वारकरी संघ तथा जगदगुरू श्री तुकोबाराय चॅरीटेबल ट्रस्ट जावळी यांचेवतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव व जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनाला ३७५ वर्षे होत असल्याचे निमित्ताने मेढा येथे १४ ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधित भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होणार असून या सोहळ्यात ७५० हून अधिक वाचक पारायण सोहळ्याला बसविण्याचा संकल्प करण्यात आला असून या सोहळ्यात विविध उपक्रमांचे आयोजन केले असून वारकरी-भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प.श्री बाळकृष्ण महाराज शिंदे यांनी केले आहे.
जावळी तालुका म्हणजे जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे पूर्वज विश्वंभरबाबा यांच्या वास्तव्याने पूनित झालेली भूमी असून या तालुक्यातील मोहाट ता.जावली येथे जगदगुरू श्री तुकोबारायाचे भव्य मंदिर निर्माण कार्य सुरू होणार असून दर पाच वर्षातून तालुका स्तरीय भव्य पारायण सोहळा संपन्न होत असतो.श्री संत ज्ञानेश्वर महाजांचे ७५० वे जयंती वर्ष व श्री संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमनाला ३७५ वर्षे होत असल्याचे निमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या सोहळ्यात कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदान करणार आहेत.
काकड आरती, ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण,भजन, प्रवचन,हरिपाठ व सायंकाळी ७ते९ या वेळेत कीर्तन व तदनंतर उपस्थितांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या यशस्वी नियोजनात अनेक भाविक भक्त योगदान देत असून अल्पोपहार,अन्नदान, ज्ञानेश्वरी ग्रंथ व अनेक गावातून महाप्रसादासाठी चपाती व भाकरी देण्यासाठी अनेक गावच्या महिला मंडळांनी पुढाकार घेतला आहे.सोहळा नेत्रदिपक व दैदिप्यमान करण्यासाठी सर्वांनी सहभागी होवून योगदान द्यावे असे आवाहन उपाध्यक्ष मोहनबापू वारागडे,खजिनदार श्री पांडूरंग संकपाळ यांनी केले आहे.या सोहळ्यासाठी प्रत्येक गावातून २० वाचक व किमान २० महिला किंवा युवक- पुरूष यांची स्वयंसेवक टिम बनवली जात असून त्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे. शांताराम कदम (8080971144) व अरूणबापू जवळ (8275838405) यांचेकडे नाव नोंदणी करण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
न्युज मराठी लाईव्ह
मेढा / जावली

टिप्पणी पोस्ट करा