मित्रमेळा फाउंडेशनच्या वतीने उद्या मराठी रंगभूमी दिनाचे आयोजन; प्रताप गंगावणेंच्या हस्ते जावळी गौरव पुरस्कारांचे वितरण होणार

प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी
सातारा (मेढा) : मित्रमेळा फाउंडेशन, जावळी यांच्या वतीने उद्या बुधवार दि. ०५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाचता जागतिक मराठी रंगभूमी दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले असून या समारंभात विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण, अध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना २०२५ च्या जावळी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण पवार यांनी मेढा येथे पत्रकार परिषदेत दिली.
       

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व सुप्रसिद्ध पटकथा-संवाद लेखक प्रताप गंगावणे यांना आमंत्रित करण्यात आले असून त्यांच्या हस्ते जावळी गौरव पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यामध्ये साहित्य, कला व नाट्य क्षेत्रातील कार्याबद्दल लोकशाहीर संभाजी भगत यांना गौरविण्यात येणार असून नाटक या कला प्रकारासाठी विलासराव गजानन रेळेकर , नाट्य चळवळीतील योगदानाबद्दल मालचौंडीच्या नवजीवन नाट्य मंडळाचा सन्मान करण्यात येणार आहे. 

उद्योजकता आणि कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल गुलाब आनंदराव भिलारे, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल कै. डॉ. राजाराम मारुती चिकणे, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल शैलेश तानाजी जाधव , सौ. मोहिनी गोळे-किर्दत व आनंदा शेलार गुरुजी, क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. सुधीर पवार, अध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ह. भ. प. आझाद महाराज गुजर, शैक्षणिक कार्यासाठी शौर्य अकॅडमी , मेढा, कला क्षेत्रातील योगदानाबद्दल ऋषिकेश लक्ष्मण दरेकर, पर्यावरण क्षेत्रातील योगदानाबद्दल कास पठार कार्यकारी समिती व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल सह्याद्री ट्रेकर्स, महाबळेश्वर यांना जावळी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 
          
या समारंभात लेखक-दिग्दर्शक शेखर रणखांबे यांच्या झी स्टुडिओ प्रस्तुत व झणकार फिल्मस् निर्मित रुबाब या मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले जाणार आहे. सदर समारंभास महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस श. प. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, जावळीचे माजी आमदार सदाशिव सपकाळ, ज्येष्ठ नेते वसंत मानकुमरे, ज्ञानदेव रांजणे,अमितदादा कदम, दिपक पवार, अंकुशबाबा कदम, एकनाथ ओंबळे, एस.एस. पार्टे गुरुजी, सौ. जयश्रीताई गिरी, अरुणा शिर्के, दत्ता गावडे, सौरभबाबा शिंदे, कांतीभाई देशमुख, पांडुरंगबापू जवळ, विक्रम भिलारे, विश्वनाथ धनावडे, संदीप पवार, शिवाजीराव मर्ढेकर, सागर धनावडे, विकास देशपांडे, सचिन करंजेकर, विश्वनाथ धनावडे, ज्ञानेश्वर दळवी, प्रदीप शेलार, सुरेश वाडकर, संजय संपकाळ, सचिन जवळ, संजय सुर्वे यांच्यासह जावळी तालुक्यातील सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित असतील. 
         
जावळीचे तहसीलदार हनुमंत कोळेकर, पी. आय. सुधीर पाटील, गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, मेढ्याचे मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त विष्णू धनावडे, नाटककार अभिनेते बाळकृष्ण शिंदे, विलासबाबा जवळ , ह. भ. प. प्रवीण शेलार, शामराव मर्ढेकर, अजितराव आपटे, आदिनाथ ओंबळे, साहित्यिक निलेश महिगावकर, सुप्रसिद्ध वक्ते प्रा. निरंजन फरांदे, प्रा. उमेश सूर्यवंशी, लेखक विशाल बांदल, निसर्गमित्र मोहन शेलार, डॉ. अभिजित कुचेकर, धनराज जगताप हे मान्यवरही समारंभास उपस्थित असतील. तरी जावळी तालुक्यातील जनतेने मित्रमेळा फाउंडेशनच्या जावळी गौरव पुरस्कार वितरण समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.




न्यूज मराठी लाईव्ह 
मेढा / सातारा

Post a Comment

Previous Post Next Post