प्रतिनिधी / मेढा (जावली)
मेढा : नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु असताना, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांमध्ये एक नाव वारंवार ऐकू येत आहे - पृथ्वीराज दळवी. प्रामाणिकपणा, जनसंपर्क आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे पृथ्वीराज दळवी हे लोकांच्या मनात "आपला माणूस" म्हणून स्थान मिळवताना दिसत आहेत.
गेल्या काही काळात त्यांनी सामाजिक कामात घेतलेली आघाडी, नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न आणि तरुणांशी जोडलेली नाळ यामुळे त्यांच्याबद्दलचा विश्वास वाढत चालला आहे. नागरिकांचा विश्वास आणि पाठिंबा पाहता, अनेकांचे म्हणणे आहे की पृथ्वीराज दळवी हेच खरे लोकांच्या मनातील नगरसेवक उमेदवार ठरत आहेत.
नगरपंचायतीच्या निवडणुकीत पृथ्वीराज दळवी हे नाव जनतेच्या मनात घर करत आहे. प्रामाणिक वृत्ती, विकासाची दृष्टी आणि सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ यामुळे ते खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातले नगरसेवक उमेदवार ठरत आहेत. जनतेचा विश्वास, तरुणांचा उत्साह आणि नागरिकांचा पाठिंबा – या तिन्हींचा संगम म्हणजे पृथ्वीराज दळवी असे मत जनसामान्य मतदार यांचे मनातून व्यक्त होत आहे. मेढा नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग 9 मधून निवडणूक लढावी अशी चर्चा सर्वत्र होत असताना दिसत आहे.
न्युज मराठी लाईव्ह
मेढा / जावली

Post a Comment