मेढा (जावली) : मेढा सेंटर विकास सेवा सोसायटी ही १४ गावांची मिळून बनलेली सोसायटी आहे. या सोसायटीवर अमित कदम यांचे वर्चस्व होते. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या वर्चस्वाला धक्का देत अतिशय नाट्यमय घडामोडीनंतर नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली या सेंटर सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी कुसुंबीचे संचालक जितीन वेंदे यांची तर व्हाईस चेअरमन पदी वागदरे येथील दत्ता शेलार यांची बिनविरोध निवड पार पडली.
जावळी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील व महत्त्वपूर्ण म्हणून मेढा सेंटर सोसायटी ओळखली जाते. गत पंचवार्षिक निवडणुकीत या मेढा सेंटर सेवा सोसायटीवर अमित कदम यांनी वर्चस्व मिळवले होते. त्यांचे १३ पैकी १२ संचालक निवडून आले होते. मात्र मध्यंतरी पुलाखालून बरेच पाणी गेल्याने विधानसभा निवडणुकीनंतर अमित कदम यांची मेढा सेंटर सोसायटीवरील पकड ढिल्ली झाली होती.
जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी अधिकचे लक्ष या सोसायटीवर केंद्रित केले होते. दरम्यान आज पार पडलेल्या चेअरमन-व्हाईस चेअरमन निवडी अतिशय नाट्यमय घडामोडी नंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली काम करू पाहणाऱ्या कुसुंबी येथील जितीन वेंदे यांची चेअरमन पदी तर व्हाईट चेअरमन पदी वागदरे येथील दत्ता शेलार यांची बिनविरोध निवड पार पडली.
संपूर्ण निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा बँक संचालक श्री.ज्ञानदेव रांजणे यांनी व सागर धनावडे,अध्यासी अधिकारी श्री.नितिन पवार, अक्षय पवार,भाजप मंडल अध्यक्ष श्री.मारुती चिकणे, यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.त्यानुसार आज या निवडी बिनविरोधरित्या पार पडल्या. नूतन पदाधिकाऱ्यांचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, नेते वसंतराव मानकुमरे आदींनी अभिनंदन केले.
न्युज मराठी लाईव्ह
मेढा / जावली


Post a Comment