दिवाळी सणानिमित्त प्रतापगड साखर कारखान्यात 13 ऑक्टोबर पासून साखर वाटपाचा शुभारंभ -चेअरमन सौरभ शिंदे


सोनगाव (जावली) : दिवाळी सणानिमित्त प्रतापगड सहकारी साखर कारखाना लि.सोनगाव करंदीशी येथे सभासद, ऊस उत्पादक सभासद तसेच बिगर सभासद ऊस उत्पादक यांना साखर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी दिली.

शिंदे यांनी सांगितले की, "सभासदांच्या हिताला नेहमीच प्राधान्य देणारा प्रतापगड साखर कारखाना या वर्षीही दिवाळी सण साखर वाटपाच्या माध्यमातून गोड करणार आहे. सभासद आणि ऊस उत्पादकांचा सहकार भावच आमची खरी ताकद आहे."

साखर वाटप कार्यक्रमाची सुरुवात सोमवार, दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.३० ते सायं. ५.०० या वेळेत करण्यात येईल. सभासदांनी साखर घेण्यासाठी साखर कार्ड, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सोबत आणणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शिंदे यांनी पुढे सांगितले की, "प्रत्येक सभासद आणि शेतकऱ्यांपर्यंत कारखान्याचा लाभ पोहोचवणे हीच आमची प्राथमिकता आहे. दिवाळीच्या निमित्ताने हा गोडवा सर्वांसाठी आनंद घेऊन येवो."

हा उपक्रम कारखान्याचे संस्थापक अजिंक्यराजे भोसले व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले असून, प्रतापगड साखर कारखान्याने पुन्हा एकदा सहकार भावनेचा आदर्श ठेवला आहे.


न्यूज मराठी लाईव्ह 
सोनगाव / जावली 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने