तालुकास्तरीय शासकिय खो-खो स्पर्धा मामुर्डी येथे संपन्न

प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी
मेढा / जावली 


मेढा (जावली) : दि.३ आय.एस.ओ. मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मामुर्डी येथे तालुकास्तरीय शासकीय खो-खो स्पर्धा संपन्न झाल्या.शिक्षण विस्तार अधिकारी मिलन मुळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय धनावडे, उपाध्यक्ष बजरंग चौधरी यांचे उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले.


शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे यांनी स्पर्धेला भेट दिली. 
१४ वर्षांखालील मुले - माध्यमिक शाळा कापसेवाडी, मुली -माध्यमिक शाळा करंदी 
१७ वर्षा खालील मुले व मुली क्रांती विद्यालय सावली
१९ वर्षांखालील मुले व मुली आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा हे संघ विजेते ठरले.
   
अंकुश सपकाळ, सागर धनावडे, शशिकांत शेलार, संतोष शेलार, विनायक करंजेकर, शितल टकले,ज्योती राऊत, अपेक्षा भोसले यांनी पंच व गुणलेखनाचे काम केले.धोंडीबा मोरे यांनी मैदान आखणी केली.आरोग्यसेवक वाघमळे व आशा सेविका सुजाता धनावडे यांनी प्रथमोपचाराची सोय उपलब्ध केली होती.स्पर्धेचे आयोजन तुकाराम शेलार यांनी केले.


न्यूज मराठी लाईव्ह 
मेढा / जावली 

Post a Comment

Previous Post Next Post