प्रतिनिधी : बजरंग चौधरी
केळघर / जावली
केळघर (जावली) : दि. ३० श्री.छ. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवकालीन राजमार्गाच्या पायथ्याशी असणाऱ्या आसनी,ओखवडी,भोगवली या तीन गावचे तरुण मंडळ एकत्र येऊन सन १९९३ मध्ये दुर्गा मातेची स्थापना केली. आज बघता बघता ३३ वर्षे पूर्ण झाली व हे ३४ वर्षे चालू असताना दरवर्षी विविध संप्रदायिक धार्मिक इतर जनजागृती सर्व कार्यक्रम या ठिकाणी होत असतात.
रोज देवीची संध्याकाळी साडेनऊ वाजता महाआरती होते व आरती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात दांडिया रास खेळला जातो त्याच बरोबर श्री केदारेश्वर भजन मंडळ मामुर्डी , श्री काडसिद्धेश्वर भजन मंडळ ओखवडी , राधा कृष्ण भजन मंडळ म्हाते बुद्रुक , साईसेवा भजन मंडळ आंबेघर ,हरि प्रसाद भजन मंडळ कळंबे ,आशीलमान भजन मंडळ असणी , ग्रामस्थ भजन मंडळ भोगवली ,चौवनेश्वर भजन मंडळ गवडी यांचा भजनाचा कार्यक्रम व कीर्तन उर्मिला भजन मंडळ मेढा यांचा मंगळा गौरी कार्यक्रम , मंडळातील ज्येष्ठ कलाकारांची लघूनाटीका ,महिलां करिता हळदी कुंकवाचा कार्यक्रम , होम मिनिस्टर , देवीचा गोंधळ , रोज दांडियारास असे अनेक विविध प्रकारचे कला नाट्य , वेगवेगळे कार्यक्रम होतात.
मंडळाचे सर्व सभासद पुणे मुंबई वरून सर्व एकत्र या कालावधीमध्ये जमतात मंडळाचे अध्यक्ष शशिकांत शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मंडळ एकजीवाणे सर्वजण काम करत असतात. समाजसेवक सागर धनावडे यांचे संपूर्ण मंडळाला फार मोठे मोलाचं सहकार्य असते तसेच सर्व उपाध्यक्ष खजिनदार सचिव सर्व मंडळाचा कारभार एकत्र बसून व्यवस्थित रित्या पार पाडतात.
तिन्ही गावातील व पंचक्रोशीतील सर्व लोकांना रोजच्या रोज प्रसाद व शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे नियोजन केले जाते तीन गावातील महिला एकत्र येऊन देवीचा जोगवा देवीची गाणी म्हणत ढोल ताशा तालात मंत्रमुग्ध होऊन नाचत असतात ही परंपरा आजही अखंडीत चालू आहे होम हवन सत्यनारायणाची महापूजा असे विविध कार्यक्रमाने नवरात्स्तव मोठ्या प्रमाणात साजरी होत असतो.
न्यूज मराठी लाईव्ह
केळघर / जावली

Post a Comment