सातारा : महाबळेश्वर मध्ये चांगले वर्चस्व असणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचा जोर अलीकडच्या काळात चांगलंच दिसून येत आहे. लोकांच्या, अडचणीसाठी आंदोलन, उपोषणाच्या माध्यमातून हा पक्ष महाबळेश्वर मध्ये पुन्हा एकदा जनसामान्याचे प्रश्न सोडवताना पाहण्यास मिळत आहे.
काही दशकांपूर्वी जिल्हाध्यक्ष माननीय. अशोक बापू गायकवाड यांचा दरारा महाबळेश्वर करांनी चांगलाच अनुभवला आहे. महाबळेश्वर मधील सक्रिय राजकारणात अशोक बापू गायकवाड यांची किंग मेकर म्हणून ओळख होती.
त्याच काळाची पुनरावृत्ती करत महाबळेश्वर तालुका अध्यक्ष जॉन भाई जोसेफ, व कार्याध्यक्ष पप्पू भोसले यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर शहराध्यक्ष विनय गायकवाड यांनी पुन्हा एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे चांगलेच वलय निर्माण केलेले आहे.
त्यामुळे सामोरे आलेल्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भूमिका नक्की काय असणार आहे? तसेच अशोक बापू गायकवाड यांचे महाबळेश्वर मध्ये घराघनीज असणाऱ्या मित्र संबंधाचा फायदा नक्की कोणाला होईल हे पण पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
महाबळेश्वर / सातारा

Post a Comment