जावली तालुक्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देऊ -संतोष कदम

प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी


जावली तालुका प्राथमिक शिक्षक समितीची सहविचार सभा संपन्न. सरचिटणीस पदी आपटी गावचे सुपुत्र संतोष नामदेव कदम गुरुजी यांची नियुक्ती.

मेढा (जावली) : दि १४ महाराष्ट्र राज्यात अग्रेसर असणारी प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवणारी संघटना म्हणजेच प्राथमिक शिक्षण समिती होय. जावली तालुका शिक्षक समितीची सहविचार सभा मंगळवार दिनांक १४/१०/२०२५ रोजी मेढा येथे संपन्न झाली.

जावली तालुक्यातील शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे यांनी संघटनेच्या बळकटीसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच आगामी तालुका मेळाव्याबाबत मार्गदर्शन केले.
       
यावेळी आपटी गावचे सुपुत्र व बामणोली व कोयना विभागाचे युवा ,खंबीर ,दिलदार ,कार्यकुशल नेतृत्व, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणारे, तालुका आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपटीचे मुख्याध्यापक, निपाणी केंद्राचे तंत्रस्नेही शिक्षक संतोष नामदेव कदम गुरुजी यांची जावली तालुका प्राथमिक शिक्षण समितीच्या सरचिटणीस पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदयजी शिंदे साहेब यांचे शुभहस्ते संतोष कदम सर यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी शिक्षक समितीचे माजी अध्यक्ष सुरेश शेलार,धिरज गोळे,संपत शेलार,विजय जुनघरे, लक्ष्मण जुनघरे, सुरेश धनावडे, रत्नाकर भिलारे,जिल्हा उपाध्यक्ष गजानन वारागडे,तालुका अध्यक्ष सुरेश पार्टे, केंद्रप्रमुख संजय आटाळे, सुरेश चिकणे,पतसंस्थेचे चेअरमन सुधाकर दुंदळे, व्हाईस चेअरमन राजेंद्र फरांदे,संचालक सखाराम मालुसरे,सुनिल शिंदे, धोंडीबा मोरे, महेश पालकर, नितीन जाधव, रामदास गोळे, विजय बांदल, रणजित शिंदे, राजेंद्र जाधव, ज्ञानेश्वर शिर्के,समीर आगलावे, संतोष शेलार, शशिकांत शेलार , सचिन पवार, प्रमोद शिर्के, बापू चव्हाण, महेश पालकर सागर धनावडे,गणेश पावडे, योगेश दिघे,बोरफळे, डोईफोडे, प्रशांत कोळेकर,हातोडे, आदी शिक्षक उपस्थित होते. जावली तालुक्यातील सर्व शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम सकारात्मक पद्धतीने करण्यात येईल असे कदम सर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.


न्यूज मराठी लाईव्ह 
मेढा / जावली 

Post a Comment

Previous Post Next Post