जिल्ह्यातील खेळाडूंना सर्वतोपरी कायम सहकार्य राहील -युवानेते साहिलबाबा शशिकांत शिंदे

प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी


मेढा (जावली): दि. १४ शिवाजी विदयापीठ कोल्हापूर अंतर्गत आणि आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा आयोजित जलतरण स्पर्धा डॉल्फिन स्विमिंग क्लब अहमदाबाद, सातारा येथे पार पडल्या. या प्रसंगी युवानेते श्री साहिलबाबा शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सातारा जिल्ह्यातील जलतरण खेळाडूंनी ध्येय ठेवून आपले करिअर उज्वल करावे त्यांना सर्वच बाबतील सदैव सहकार्य राहील. स्पर्धेला सामोरे जाताना सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत महत्वाचा असून तो खेळाडूंनी जोपासवा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आणि उदघाटक श्री. साहिलबाबा शिंदे उपस्थित होते.

तर अध्यक्षस्थानी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी उपस्थित होते. त्यांनी सराव आणि मेहनत खेळाडूंना यशस्वी होण्यात अत्यंत पूरक भूमिका बजावते असे नमूद केले. तसेच विविध खळाडूंची उदाहरणे देऊन खेळाडूंना प्रोत्साहित केले. प्रमुख उपस्थिती म्हणून महाविदयालय विकास समिती सदस्य प्रा. डॉ प्रमोद घाटगे उपस्थित. त्यांनी विध्यार्थीना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सातारा विभागीय क्रीडा परिषदेचे सचिव प्राध्यापक दत्तात्रय गायकवाड उपस्थित होते.

सदर स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्यातील सोळा महाविदयालयातील बावन्न मुले आणि मुली यांनी सदर स्पर्धेसाठी जलतरणच्या विविध प्रकारात सहभाग नोंदवला. कार्यक्रमासाठी सातारा विभागीय क्रीडा परिषदेचे सचिव प्रा. दत्तात्रय गायकवाड, सातारा जिल्ह्यातील अनेक महाविदयालयातील शारीरिक शिक्षण संचालक आणि मोठया संख्येने खेळाडू उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिमखाना प्रमुख प्रा. डॉ. प्रमोद चव्हाण यांनी केले.आभार प्रा डॉ प्रमोद घाटगे सर यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. प्रकाश जवळ यांनी केले.


न्यूज मराठी लाईव्ह 
मेढा / जावली

Post a Comment

Previous Post Next Post